करवसुली ५0 टक्क्यांपेक्षा कमी

By admin | Published: January 9, 2015 01:40 AM2015-01-09T01:40:20+5:302015-01-09T01:40:20+5:30

वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा आढावा , बहुतांश ग्रामपंचायतीचा निधी अखर्चित.

Taxes less than 50 percent | करवसुली ५0 टक्क्यांपेक्षा कमी

करवसुली ५0 टक्क्यांपेक्षा कमी

Next

वाशिम : ग्राम पंचायतनिहाय सर्व योजनेचा तालुक्यातील ग्राम पंचायतींचा आढावा घेण्यात आला. सभेमध्ये प्रामुख्याने खालील १३ वा वित्त आयोग अंतर्गत पूर्ण-अपूर्ण कामांत बहुतांशी ग्राम पंचायतीचा निधी अखर्चित असल्याची बाब निदर्शनास आली, तसेच ग्रामपंचायतीची करवसुलीही ५0 टक्क्यांपेक्षा कमी आढळून आली. ८ जानेवारी रोजी पंचायत समिती सभागृह वाशिम येथे सभापती वीरेंद्र देशमुख यांनी सभेमध्ये उपअभियं ता ल.सी. विश्‍वास घुगे, बांधकाम विभाग उपअभियंता टाले, गटशिक्षण अधिकारी देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी दुगाने, बाल विकास प्रकल्प अधिकारी नायक, गटविकास अधिकारी मनोज खिल्लारी व तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांची आढावा सभा सकाळी १0.00 वाजता घेतली. ग्राम पंचायत कर वसुलीचा आढावा घेत असताना डिसेंबर २0१४ अखेर ७0 टक्के कर वसुली अपेक्षित असताना बहुतांशी ग्राम पंचायतीची कर वसुली ५0 टक्क्यांपेक्षा कमी असल्याची बाब निदर्शनास आली. या दरम्यान ग्रामसेवक संघटनेकडून दुष्काळी परिस्थिती व नैसर्गिक आपत्तीमुळे कर वसुलीला ग्रामीण जनतेचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे, अपेक्षित कर वसुली होत नसल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले. दलित वस्ती सुधार योजना, तांडा वस्ती सुधार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, इंदिरा आवास योजना, विशेष घटक योजना, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान अंतर्गत सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला. अपूर्ण असलेली बांधकामे विहीत मुदतीत पूर्ण करुन १00 टक्के उद्दिष्ट साध्य करावे व पूर्ण झालेल्या कामांचे पुर्णत्वाचे प्रमाणपत्र पुढील आढावा सभेपूर्वी देण्याबाबत सर्व ग्रामसेवक , ग्राम विकास अधिकारी तथा शाखा अभियंता, विस्तार अधिकारी यांना आदेशीत केले, तसेच ग्रामसेवकांना विहीत मुदतीत कामे करणेबाबत सक्त ताकीद देण्यात आली. स्वच्छ भारत मिशनचा आढावा घेतला असता पंचायत समिती वाशिमची ग्रामीण भागातील शौचालय बांधकामाची प्रगती असमाधानकारक असल्याची बाबही निदर्शनास आली.

Web Title: Taxes less than 50 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.