१३ हजारांवर करदात्यांनी केले नाही पैसे परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:27 AM2021-06-28T04:27:46+5:302021-06-28T04:27:46+5:30

जिल्ह्यात पीएम किसान पेन्शन योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकरी लाभार्थींची एकूण संख्या १ लाख ९९ हजार ३८० आहे. त्यापैकी १५ ...

Taxpayers have not refunded over Rs 13,000 | १३ हजारांवर करदात्यांनी केले नाही पैसे परत

१३ हजारांवर करदात्यांनी केले नाही पैसे परत

Next

जिल्ह्यात पीएम किसान पेन्शन योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकरी लाभार्थींची एकूण संख्या १ लाख ९९ हजार ३८० आहे. त्यापैकी १५ हजार १६६ जण करदाते असल्याची बाब पडताळणीत उघड झाली. शासनाच्या आदेशानुसार संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम वसूल करण्याची कार्यवाही गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे; मात्र आतापर्यंत केवळ १७२७ जणांनीच पैसे परत केले असून ही रक्कम १ कोटी ६५ लाख ५२ हजार रुपये इतकी आहे. १३ हजार ४३९ जणांकडून अद्यापपर्यंत पैसे वसूल झालेले नाहीत, अशी माहिती मिळाली.

.....................

कोट :

करदाते असूनही पीएम किसान पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या १५ हजार १६६ लाभार्थींकडून पैसे परत मिळविण्याची कार्यवाही सातत्याने सुरू आहे. त्यातील १७२७ जणांनी पैसे परत केले; मात्र अद्याप १३ हजार ४३९ जणांकडून पैसे परत मिळणे बाकी आहे. प्रशासकीय पातळीवरून पाठपुरावा केला जात आहे.

- शंकर तोटावार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

Web Title: Taxpayers have not refunded over Rs 13,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.