जूनी पेन्शन योजनेसाठी शिक्षक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:42 PM2019-06-03T13:42:31+5:302019-06-03T13:42:40+5:30
शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना आक्रमक झाली असून ११ जून रोजी कौंडण्यपुर जि. वर्धा येथे आंदोलन केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना आक्रमक झाली असून ११ जून रोजी कौंडण्यपुर जि. वर्धा येथे आंदोलन केले जाणार आहे. यासंदर्भात वाशिम येथे शिक्षकांची बैठक पार पडली असून, या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत रूजू झालेल्या कर्मचाºयांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करून जूनी पेन्शन योजना बंद केली आहे. त्यामुळे हा एकप्रकारे कर्मचाºयांवर अन्याय असून, जूनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनांनी यापूर्वी विविध टप्प्यात आंदोलने केली, शासनाला निवेदन दिले. मात्र, अद्याप याची दखल घेण्यात आली नाही. जूनी पेन्शन योजनेसंदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्यावतीने अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यात बैठका घेण्यात आल्या. या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यापेक्षा शिक्षक महासंघाने व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने सभागृहाबाहेरची रस्त्यावरची लढाई लढावी व शासनाला जुन्या पेन्शनची घोषणा करण्यास बाध्य करावे असे निश्चित करण्यात आले. त्याअनुषंगाने जूनी पेन्शन योजनेच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पहिल्या टप्प्यात कौंडण्यपुर येथे ११ जुन रोजी ‘जलसमर्पण आंदोलन’ केले जाणार आहे. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील शिक्षक महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.