विविध मागण्यांसंदर्भात शिक्षक संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 03:04 PM2018-07-17T15:04:23+5:302018-07-17T15:05:14+5:30
वाशिम - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित असून, याप्रकरणी न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १७ जुलै रोजी निवेदनाद्वारे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित असून, याप्रकरणी न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १७ जुलै रोजी निवेदनाद्वारे केली.
आॅगस्ट २०१७ पासून चट्टोपाध्याय प्रस्ताव निकाली निघाले नाहीत. २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाºयांचे निवडश्रेणी प्रस्तावदेखील आॅक्टोंबर २०१७ पासून प्रलंबित असल्याचे शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. सन २००८ पासून उच्चश्रेणी मुख्याध्यापकांच्या पदोन्नत्या झाल्या नाहीत, सर्व विषय शिक्षकांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्ती दिनांकापासून पदवीधर वेतनश्रेणी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. पंचायत समिती स्तरावर सेवापुस्तक अद्ययावत केली जात नाहीत. वेतनवाढ नोंदी, सेवापडताळणी, बदलीबाबत नोंदी आदीसंदर्भात पंचायत समिती स्तरावर अद्ययावत माहिती ठेवली जात नसल्याचा फटका शिक्षकांना बसत आहे. त्यामुळे या अद्ययावत नोंदीसंदर्भात वरिष्ठस्तरावरून तपासणी करण्यात यावी, वैद्यकीय देयकाबाबत पंचायत समिती स्तरावर संबंधित लिपिकाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे अनेक शिक्षकांचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरच धूळखात असतात यासह शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित असून, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.