जिल्हाबाह्य शिक्षक बदलीप्रकरणात नियमाला बगल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 02:25 PM2018-07-31T14:25:58+5:302018-07-31T14:30:20+5:30

मानोरा: परस्पर समन्वयाने जिल्हाबाह्य बदली झालेल्या शिक्षकाला नियुक्त ठिकाणावरून किमान ३ वर्षे हलविता येत नाही; परंतु मानोरा पंचायत अंतर्गत या नियमाला बगल देण्याचा प्रकार घडला आहे.

Teacher transfer washim district | जिल्हाबाह्य शिक्षक बदलीप्रकरणात नियमाला बगल 

जिल्हाबाह्य शिक्षक बदलीप्रकरणात नियमाला बगल 

Next
ठळक मुद्देवर्धा जिल्ह्यातून मानोरा तालुक्यात गोस्ता येथे बदली झालेल्या शिक्षिकेला तीनच महिन्यात कुपटा येथे हलविले.हे प्रकरण तापत असल्याने सदर शिक्षिकेला पुन्हा गोस्ता येथे रुजूही करण्यात आले. परंतु त्यापूर्वी तिची पदस्थापना कुपटा येथे दाखवून वेतनही काढल्याची चूक उघडकीस आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा: परस्पर समन्वयाने जिल्हाबाह्य बदली झालेल्या शिक्षकाला नियुक्त ठिकाणावरून किमान ३ वर्षे हलविता येत नाही; परंतु मानोरा पंचायत अंतर्गत या नियमाला बगल देण्याचा प्रकार घडला आहे. वर्धा जिल्ह्यातून मानोरा तालुक्यात गोस्ता येथे बदली झालेल्या शिक्षिकेला तीनच महिन्यात कुपटा येथे हलविले. हे प्रकरण तापत असल्याने सदर शिक्षिकेला पुन्हा गोस्ता येथे रुजूही करण्यात आले; परंतु त्यापूर्वी तिची पदस्थापना कुपटा येथे दाखवून वेतनही काढल्याची चूक उघडकीस आली आहे. 
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात असलेल्या शिवणफळ जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षिकेची परस्पर समन्वयातून जिल्हाबाह्य बदली करण्यात आली. या अंतर्गत तिला वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील गोस्ता येथे पदस्थापना देण्यात आली. जिल्हाबाह्य बदली प्रकरणात एकदा पदस्थापना दिलेल्या ठिकाणावर किमान ३ वर्षांपर्यंत कार्य करावे लागते. मानोरा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने मात्र या नियमाला केराची टोपली दाखवित. सदर शिक्षिकेची ३ महिन्यांतच कुपटा येथील जिल्हा परिषद शाळेत रिक्त असलेल्या पदावर नियुक्ती केली. ही चूक उघड होऊन प्रकरण अंगलट आल्याची जाणीव होताच शिक्षण विभागातील संबंधितांनी या शिक्षिकेला गोस्ता येथे परत रुजू केले. दरम्यान, कुपटा येथील रिक्त पद असल्याने त्या पदाचा कार्यभार सोपवून किमान सदर शिक्षिकेचे वेतन हे नियमानुसार गोस्ता येथून काढणे आवश्यक होते, अर्थात सदर शिक्षिकेची तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती दाखविणे गरजेचे होेते; परंतु पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने या शिक्षिकेची पदस्थापनाच कुपटा येथे करून. त्याच शाळेच्या नावे तिचे वेतन मंजूर केल्याचा प्रकारही घडला आहे. हे प्रकरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पोहोचल्यानंतर त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपविली; परंतु त्यात अद्यापही काहीच झालेले नाही. दरम्यान, या संदर्भात मानोरा पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाºयांशी संपर्क साधून माहिती घेतली असता. या प्रकरणी सर्व संबंधितांशी संवाद साधून प्रकरणाचा उलगडा करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Web Title: Teacher transfer washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.