जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:40+5:302021-07-07T04:51:40+5:30
शिक्षकांना १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असलेल्या सर्व शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, त्याशिवाय ...
शिक्षकांना १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असलेल्या सर्व शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा सूर या सभेमध्ये निघाला. या सभेमध्ये मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनोद नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व निमंत्रक म्हणून जुनी पेन्शन योजना समिती उपाध्यक्ष विजय भड यांच्या उपस्थितीत सभेमध्ये निर्णय घेण्यात आले. जुनी पेन्शन योजना करण्यासंदर्भात शासन दरबारी सकारात्मक चर्चा सुरू आहे. शासनाने जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास आंदोलन करू, अशी भूमिका या सभेमध्ये घेण्यात आली.
..........
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी. इतर क्षेत्रांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाली. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये शासनाची दिरंगाई का, असा प्रश्न पुढे येत आहे.
विनोद नरवाडे, जिल्हाध्यक्ष,
मुख्याध्यापक संघ, वाशिम