विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे वाशिममध्ये शनिवारी धरणे आंदोलन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 02:07 PM2018-02-15T14:07:48+5:302018-02-15T14:32:28+5:30
वाशिम - शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे.
वाशिम - शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. जिल्हयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेचे अमरावती विभागीय सहकार्यवाह राजकुमार बोनकीले यांनी केले.
परिषदेच्या १० व ११ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे पार पडलेल्या प्रांत अधिवेशनास संघटनेचे राजकुमार बोनकिले, विश्वनाथ सांगळे, धनंजय पांडे, कैलास बोरचाटे, दादाराव अंभोरे, पाचुसिंग साबळे, राजेंद्र घोरसड, नरेश सुरळकर, गणेश बेंडवाले, मोरे आदींनी सहभागी घेतला होता. या अधिवेशनात ठरल्याप्रमाणे १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन ठेवण्यात आले आहे. यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येईल. परिभाषीत अंशदायी पेन्शन योजना बंद करुन जुनी पेन्शन योजना लागु करावी, केंद्रीय कर्मचाऱ्यां प्रमाणे १ जानेवारी २०१६ पासून राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तरांना सातवा वेतन आयोग त्वरीत लागु करावा व नवीन परिभाषित अंशदायी पेंशन योजनेचा ३१ आॅक्टोंबर २००५ व २९ नोव्हेंबर २०१० चा शासन निर्णय रद्द घोषित करून जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागु करावी आदी मागण्यांसाठी सदरचे धरणे आंदोलन आयोजीत करण्यात आले आहे.
या धरणे आंदोलनात जिल्हयातील म.रा. शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यां नी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विभागीय सहकार्यवाह राजकुमार बोनकिले, जिल्हाध्यक्ष अजाबराव महल्ले, जिल्हा कार्यवाह विश्वनाथ सांगळे, धनंजय पांडे, राजेश मेहनकर, दादाराव अंभोरे, राजेश घोरसड, कैलास बोरचाटे, नरेश सुरळकर, पाचुसिंग साबळे, शैलेश वाडेकर, अमोल काटेकर, राजेश संगवई, विजय मोरे, सुदेश लोखंडे, प्रकाश राठोड, रामचंद्र वानखडे, प्रा. देशमुख आदींनी केले आहे.