शिक्षकांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने उभारल्या वर्गखोल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 04:09 PM2019-03-19T16:09:41+5:302019-03-19T16:09:49+5:30
शिक्षकांनी पुढाकार घेत ग्रामस्थांचे सहकार्य मिळवित स्वखर्चातून वर्गखोल्या उभारुन हा प्रश्न तूर्तास तरी निकाली काढला.
शिष्यांसाठी द्रोणाचार्यांचे असेही योगदान!
मेडशी : येथुन जवळच असलेल्या शंभर टक्के आदिवासी वस्तितील ग्राम वाकळवाडी येथील जि.प. प्राथ व माध्यमीक शाळेत वर्गखोल्यांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना उघडयावर शिक्षण घेण्याची वेळ आली होती. येथील शिक्षकांनी पुढाकार घेत ग्रामस्थांचे सहकार्य मिळवित स्वखर्चातून वर्गखोल्या उभारुन हा प्रश्न तूर्तास तरी निकाली काढला. शिष्यांसाठी द्रोणाचार्यांच्या या योगदानाबाबत गावकºयांच्यावतिने कौतूक केल्या जात आहे.
शाळेत असलेल्या अपुºया वर्गखोल्या पाहता शिक्षकांनी त्यांच्यापरिने खोल्या तर उभारल्यात परंतु खोल्यांसाठी छत नसल्याने ग्रामपंचायतकडे प्रस्ताव सादर केला आहे. वर्गखोल्यांवर छताचे तात्पुरते नियोजन करुन तेथे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाच्या कार्यास प्रारंभ केला आहे. येथील जि.प. शाळेमध्ये वर्ग १ ते वर्ग ८ पर्यंत असून १३३ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. वर्गखोल्या मात्र चार त्यामध्येही चारपैकी एका वर्ग खोलीत शाळेचे कार्यालय व शालेय पोषण आहार ठेवण्यात येतो. पर्याची इयत्ता ४ ते सहावीच्या विद्यार्थ्यांना व्हरांडयात शिक्षणाचे धडे घ्यावे लागत होेते. विद्यार्थ्यांची होणारी अडचण लक्षात घेता शाळेतील ७ शिक्षकांनी वर्गणी करुन टिनपत्रे व बांबुच्या ताटव्यांच्या तीन वर्ग खोल्या ग्रामस्थांच्या सहाय्याने तयार केल्या.
शिक्षकांबरोबर यामध्ये ग्रामस्थांचे योगदान मोलाचे असुन ग्रा.पं. कडून लवकर निधी मिळविण्याचा प्रयत्न आहे.
- गजानन शिंदे, शाळा सुधार शिक्षण समिती अध्यक्ष वाकळवाडी.
शाळेला लागुन उकीरडे असल्याने यात्रा त्रास सुध्दा विद्यार्थ्यांना होतो. एवढे असले तरी शिक्षक व शाळा समितीने पुढाकाराला प्रोत्साहन व शासन स्तरावरील सहाय्यतेची आवश्यकता आहे. छताकरिता १४ व्या वित्त आयोगांतर्गत टिनपत्रे, दरवाजे, फर्सीची ग्रा.पं.कडे मागणी केलेली आहे.
-बंडू महाले, मुख्याध्यापक जि.प.शाळा वाकळवाडी.