क्रीडा स्पर्धांसाठी शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या तालुकानिहाय सभा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 07:45 PM2017-08-01T19:45:59+5:302017-08-01T19:47:52+5:30
वाशिम - शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महाराष्ट्र राज्य व क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत वाशिम जिल्हा क्रिडा अधिकारी व जिल्हा क्रिडा परिषदेच्यावतीने सन २०१७ -१८ या आर्थिक वर्षात विविध शालेय क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महाराष्ट्र राज्य व क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत वाशिम जिल्हा क्रिडा अधिकारी व जिल्हा क्रिडा परिषदेच्यावतीने सन २०१७ -१८ या आर्थिक वर्षात विविध शालेय क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. यासंदर्भात शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या तालुकानिहाय सभांचे नियोजन क्रीडा विभागाने केले आहे.
सदर शालेय क्रीडा स्पर्धा या जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय वाशिम व विविध संघटनेच्या सहकार्याने होत आहे. प्रत्येक शाळांनी किमान २ सांघिक व ३ वैयक्तीक क्रिडा प्रकारामध्ये सहभागी होणे बंधनकारक असून २ एप्रिल २००५ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळेने क्रिडा स्पर्धेत भाग घेणे आवश्यक आहे. त्यानुसार सन २०१७ -१८ च्या स्पर्धेच्या आयोजन व नियोजन करण्याच्या दृष्टीने तालुकानिहाय सभा आयोजित करण्यात आली आहे. कारंजा तालुक्यातील शारीरिक शिक्षण शिक्षकांची सभा २ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता शोभनाताई चवरे हायस्कलु कारंजा येथे होईल. मानोरा तालुक्याची सभा २ आॅगस्टला दुपारी २.३० वाजता वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे, मंगरुळपीर तालुका २ आॅगस्टला २.३० वाजता जि.प.हायस्कुल मंगरुळपीर येथे, वाशिम तालुका ३ आॅगस्टला दुपारी ३ वाजता जिल्हा क्रिडा संकुल वाशिम येथे, रिसोड तालुका ३ आॅगस्टला दुपारी १ वाजता श्री भारत माध्यमिक कन्या शाळा रिसोड येथे तर मालेगाव तालुक्याची सभा ३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ना.ना.मुंदडा विद्यालय मालेगाव येथे होणार आहे.