शिक्षकाच्या मुलाची असिस्टंट कमांडंट पदाला गवसणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:41 AM2021-05-23T04:41:14+5:302021-05-23T04:41:14+5:30
अभंगचे दहावी पर्यंतचे शिक्षण रिसोडच्या भारत माध्यमिक शाळेत पूर्ण झाले. अभ्यासात हुशार असल्याने तो वर्गात नेहमी प्रथम क्रमांकावरच राहिला. ...
अभंगचे दहावी पर्यंतचे शिक्षण रिसोडच्या भारत माध्यमिक शाळेत पूर्ण झाले. अभ्यासात हुशार असल्याने तो वर्गात नेहमी प्रथम क्रमांकावरच राहिला. चौथ्या वर्गात असताना त्याने शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातून तृतीय क्रमांक; तर सातवीत असताना झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला होता. दहावीनंतर पुणे येथे शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात त्याने ९४ टक्के गुण मिळवून अमरावतीच्या शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर चाणक्य मंडळ, पुणे येथे प्रवेश मिळाला. दुसऱ्याच प्रयत्नात अभंगने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या केंद्रीय सशस्त्र दलात असिस्टंट कमांडंट ऑफ इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) राजपत्रित अधिकारी सवंर्ग एक या पदाला गवसणी घातली. गुणवत्ता यादीत त्याचा ४७ वा क्रमांक आहे. सध्या मसूरी येथे तो प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षणानंतर धिरांग (अरूणाचल प्रदेश) नियुक्ती मिळणार असल्याची माहिती त्याचे वडिल दिलीप जोशी यांनी दिली.