जून्या पेन्शनसाठी शिक्षक, शिक्षकेतराचा संप; शाळा बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 06:26 PM2019-09-09T18:26:33+5:302019-09-09T18:26:50+5:30
वाशिम जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाल्याने बहुतांश शाळा बंद आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: नोहेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शासकीय, निमशासकीय व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शिक्षक, शिक्षकेतरांनी ९ सप्टेंबर रोजी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाल्याने बहुतांश शाळा बंद आहेत.
नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना मूळ शाश्वत पेन्शन योजना, कुटुंब निवृत्ती वेतन योजना, भविष्य निर्वाह निधी योजना नसणे हा अन्याय असल्याचा आरोप जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने करण्यात आला. जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी अनेकवेळा निवेदने दिली तसेच आंदोलने केली. परंतू अद्याप दखल घेण्यात आली नाही. या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, ९ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला. जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्वच शिक्षक संघटनांचे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.