शिक्षक, विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 03:02 PM2019-02-23T15:02:30+5:302019-02-23T15:03:00+5:30
इंझोरी (वाशिम) : तंबाखु, चहाचे व्यसन आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत इंझोरीच्या जि.प. शाळेत हभप रामेश्वर महाराज खोडे यांनी शिक्षक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी (वाशिम) : तंबाखु, चहाचे व्यसन आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत इंझोरीच्या जि.प. शाळेत हभप रामेश्वर महाराज खोडे यांनी शिक्षक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून २३ फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी खोडे महाराजांनी शिक्षक, विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच व्यसनाबाबत त्यांना स्वसंवाद साधून मनाचा कल घेण्याचे आवाहनही केले.
वैरागी संत गाडगे बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून इंझोरी येथील जि.प. केंद्र शाळेत व्यसनमुक्ती सम्राट रामेश्वर महाराज खोडे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खोडे महाराजांनी शिक्षक, विद्यार्थ्यांशी संवाद साधून गाडगेबाबांच्या मंत्रानुसार व्यसनमुक्तीबाबत सखोल मार्गदर्शन केले. तंबाखु, चहाचे दुष्परिणाम पटवून देतानाच स्वत:च्या आणि शाळेसह गावाच्या स्वच्छतेचेही महत्त्व त्यांनी सांगितले. यावेळी व्यसनाबाबत स्वत:शी संवाद साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या या आवाहनानुसार आचरण करण्याची ग्वाही विद्यार्थी, शिक्षकांनी दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनिता देविदास राठोड, तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक गणेश कदम उपस्थित होेते. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थ्यांसह गावकºयांचीही उपस्थिती होती.