शिक्षक दिनी शिक्षकांचे काळ्या फिती लावून कामकाज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 08:35 PM2017-09-05T20:35:31+5:302017-09-05T20:38:53+5:30
वाशिम : शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणाचा निषेध नोंदवित वाशिम जिल्ह्यात विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिशनच्यावतीने (विजुक्टा) शिक्षक दिनी ५ सप्टेंबरला काळ्या फिती लावून कामकाज केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणाचा निषेध नोंदवित वाशिम जिल्ह्यात विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिशनच्यावतीने (विजुक्टा) शिक्षक दिनी ५ सप्टेंबरला काळ्या फिती लावून कामकाज केले.
अनेक वर्षापासून विनावेतन काम करणारे शिक्षक वठबिगारीचे जीवन जगत असून, सेवानिवृत्तीनंतर सुरक्षिततेची त्यांना कोणतीच हमी नाही. अत्यल्प वेतन असताना निवृत्तीवेतनही नाही, अनुदानित वर्ग बंद करून शिक्षकांना वेठीस धरून अतिरिक्त करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे, असा आरोप करीत विजुक्टाने ५ सप्टेंबरला शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंश अनुदानावर व सेवेत असलेल्या, तसेच त्यानंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, पात्र कनिष्ठ महाविद्यालयाची यादी घोषित करुन त्यांना अनुदान सूत्र लागू करावे तसेच २४ वर्ष सेवा झालेल्या पात्र शिक्षकांना विनाअट सरसकट निवड श्रेणी देण्यासह इतर मागण्यांसाठी विजुक्टाच्यावतीने काळयाफिती लावून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विजुक्टाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.