दारूबंदीसाठी वाकद येथे ग्रामस्थांचे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 07:37 PM2017-08-04T19:37:30+5:302017-08-04T19:38:33+5:30

रिसोड: तालुक्यातील वाकद येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री कायम बंद करण्याचा चंगच गावकºयांनी केला आहे. यासाठी २० युवकांचा समावेश असलेले पथक स्थापन करण्यात आले असून, हे पथक अवैध दारूविक्री करणाºया पकडून पोलिसांच्या स्वाधीन करणार आहे.

A team of villagers at Vadod | दारूबंदीसाठी वाकद येथे ग्रामस्थांचे पथक

दारूबंदीसाठी वाकद येथे ग्रामस्थांचे पथक

Next
ठळक मुद्देपोलिसांना मदत: ठाणेदारांच्या मार्गदर्शनात करणार कार्य२० युवकांचा समावेश असलेले पथक स्थापन

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड: तालुक्यातील वाकद येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री कायम बंद करण्याचा चंगच गावकºयांनी केला आहे. यासाठी २० युवकांचा समावेश असलेले पथक स्थापन करण्यात आले असून, हे पथक अवैध दारूविक्री करणाºया पकडून पोलिसांच्या स्वाधीन करणार आहे.
वाकद येथे मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे गावाची शांतता भंग झाली होती. त्यासाठी पोलीस पाटील विजय रत्नपारखी, तंटामुक्ती अध्यक्ष वैजनाथ चोपडे, माजी पं.स. उपसभापती सैय्यद अकिलभाई, रावसाहेब देशमुख, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर,  शंकरसिंह ठाकूर यांनी रिसोडच्या ठाणेदारांना गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी कारवाई करण्याची मागणी करतानाच याबाबत त्यांना सहकार्य करण्याचा निर्धारही केला. त्यानुसार ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी ३ आॅगस्ट रोजी गावात सभा घेतली आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ४ आॅगस्ट रोजी वाकद येथील अवैध दारूविक्रीवर आळा घालण्यासाठी २० युवकांचे पथक स्थापन करण्यात आले असून, हे पथक गावात अवैध दारूविक्री करताना कोणी आढळल्यास त्याबाबत पोलिसांना कळवून त्याला पोलिसांच्या हवाली करणार आहे. यासाठी ठाणेदार राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन त्यांना लाभणार आहे. 

Web Title: A team of villagers at Vadod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.