अर्ज भरताना तांत्रिक अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:43 AM2021-01-13T05:43:47+5:302021-01-13T05:43:47+5:30
चेतना केंद्र उपक्रम; किन्हीराजाला डच्चू किन्हीराजा : गावस्तरावरच शेतकऱ्यांना प्रशिक्षण व योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच शेतकऱ्यांसाठी सभागृहाची सुविधा उपलब्ध ...
चेतना केंद्र उपक्रम; किन्हीराजाला डच्चू
किन्हीराजा : गावस्तरावरच शेतकऱ्यांना प्रशिक्षण व योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच शेतकऱ्यांसाठी सभागृहाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशातून जिल्ह्यात आठ शेतकरी चेतना केंद्र साकारले जात आहेत. या उपक्रमातून किन्हीराजा गावाला वगळण्यात आले आहे.
००००
चार दिवसांत नवीन कोरोना रुग्ण नाही
मालेगाव : मालेगाव शहरासह तालुक्यात ६ ते ९ जानेवारी या चार दिवसांत नव्याने एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही, ही बाब तालुकावासीयांना दिलासा देणारी ठरत आहे. कोरोनाचा आलेख आणखी खाली येत असल्याचे मालेगाव तालुक्यात दिसून येते.
००
निवडणूक काळात शांतता राखा !
केनवड : केनवडसह परिसरातील ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनासह महसूल यंत्रणेने शनिवारी आढावा घेतला. निवडणूक काळात शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन रिसोड तहसील प्रशासनाने केले.
०००००
रोहित्र मिळेना; सिंचन प्रभावित
रिठद : यंदा सिंचनासाठी विहिरींसह लघुप्रकल्पांत बऱ्यापैकी पाणी आहे. परंतु रिठद परिसरातील जवळपास तीन ते चार विद्युत रोहित्र नादुरूस्त असल्याने आणि रोहित्र बदलून मिळत नसल्याने सिंचन प्रभावित होत आहे.
००००
‘त्या’ आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई
रिसोड : निवडणूक काळात शांतता राहावी म्हणून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी १९ जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत. या आदेशाचे पालन तालुक्यातील नागरिकांनी करावे, आदेशाचे उल्लंघन झाल्यास शासन नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार अजित शेलार यांनी रविवारी दिला.