कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 07:14 PM2017-09-10T19:14:10+5:302017-09-10T19:14:34+5:30

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी भेडसावत असल्याने शेतकºयांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. 

Technical difficulties in the online loan recovery process; Farmers suffer | कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; शेतकरी त्रस्त

कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; शेतकरी त्रस्त

Next
ठळक मुद्देशेतक-यांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहेजिल्ह्यात ३४६ आपले सरकार केंद्र, १३३ महा ई सेवा केंद्र, ३०९ बायोमॅट्रिक मशीन आॅनलाईन अर्ज भरण्याला केवळ पाच दिवस शिल्लक 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी भेडसावत असल्याने शेतकºयांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. 
राज्य शासनाने २००९ पासून ते ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्जमाफी जाहिर केलेली आहे तसेच सन २०१२ -१३ ते २०१५-१६ या वर्षात पीककर्ज पुनर्गठण केलेल्या; पण ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना कर्जमाफीच्या कक्षेत घेण्यात आले. याशिवाय नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना २५ हजार रुपयांपर्यंत अथवा २५ टक्के प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. यासाठी पात्र शेतकºयांकडून १५ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येत आहेत. वाशिम जिल्ह्यात ३४६ आपले सरकार केंद्र, १३३ महा ई सेवा केंद्र, ३०९ बायोमॅट्रिक मशीन अशा ठिकाणी शेतकºयांना मोफत स्वरुपात आॅनलाईन अर्ज व घोषणापत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याला केवळ पाच दिवस शिल्लक असून, अनेक शेतकºयांना तांत्रिक बिघाडामुळे अद्याप अर्ज भरता आले नाहीत. कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान याचा लाभ मिळविण्यसाठी आॅनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. ८ सप्टेंबरपर्यंत १ लाख ७८ हजार शेतकºयांनी विविध केंद्रांवर नाव नोंदणी केली होती. यापैकी १ लाख ३० हजार शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली तर नाव नोंदणी झाल्यानंतरही आवश्यक कागदपत्रे नसल्याने किंवा शेतकरी पती-पत्नी हजर नसल्याने उर्वरित शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज भरले गेलेले नाहीत. याशिवाय काही शेतकºयांनी अद्याप नोंदणीच केलेली नाही. या सर्व शेतकºयांना महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जावून आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. ग्रामीण भागात सर्व्हर डाऊन होणे, ‘थम्ब’ न घेणे, नेट कनेक्टिव्हिटी न मिळणे आदी तांत्रिक कारणांमुळे अर्ज भरण्यास विलंब होत आहे. 

Web Title: Technical difficulties in the online loan recovery process; Farmers suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.