महाभूलेख पोर्टलवरील सातबारात तांत्रिक दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 11:13 AM2020-07-24T11:13:04+5:302020-07-24T11:13:30+5:30
जिल्ह्यातील तब्ब्ल १०७ गावांतील शेतकऱ्यांना ही समस्या जाणवत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: प्रधानमंत्री पीकविमा योजनेत शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढतच असून, काही बँका विमा भरून देण्यास नकार देत असतानाच आता पीकविमा योजनेच्या पोर्टलवर महाभूलेख पोर्टलवरील आॅनलाईन सातबारा तांत्रिक दोषामुळे अपलोड करण्यात अडचणीत येत आहेत. जिल्ह्यातील तब्ब्ल १०७ गावांतील शेतकऱ्यांना ही समस्या जाणवत आहे.
यंदाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यास शासनाने मंजुरी दिली. त्यानंतर १ जुलैपासून शेतकरी या योजनेत सहभागी होण्यासाठी धडपड करीत आहेत. शेतकºयांच्या समस्येचा गैरफायदा सुरुवातीला आपले सरकार सेवा केंद्रांकडून घेण्यात येत असल्याचे कळल्यानंतर, काही बँका शेतकºयांना पीकविमा भरून देण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून करण्यात येत होत्या. ही अडचण दूर करण्यात येत असतानाच आता शासनाच्या महाभूलेख पोर्टलवरील आॅनलाईल सातबारा अद्ययावत नसल्याने पीकविम्याच्या अर्जाशी जोडण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील १०७ गावांतील शेतकºयांना ही समस्या जाणवत असल्याचे कळले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली तातडीची बैठक
महाभूलेख पोर्टलवरील आॅनलाईन सातबारात तांत्रिक दोष असल्याने पीकविमा भरणाºया शेतकºयांना अडचणी येत असल्याचे कळल्यानंतर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी गुरुवारी सायंकाळी अधिकाºयांची तातडीची बैठक घेतली.
महाभूलेख पोर्टलवरील आॅनलाईन सातबारा व्हेरीफाय होत नसल्याने प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील १०७ गावांत ही समस्या जाणवत असल्याची माहिती आपले सरकार सेवा केंद्रांकडून मिळाली आहे.
- ज्ञानेश्वर बोबडे, जिल्हा समन्वयक, प्रधानमंत्री पीकविमा योजना