२० व्या पशुगणना प्रक्रियेतील तांत्रिक अडथळे दूर होईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 02:55 PM2019-05-14T14:55:02+5:302019-05-14T14:55:24+5:30

वाशिम : राज्यभरात जानेवारी महिन्यापासून सुरू असलेल्या २० व्या पशुगणनेला तांत्रिक स्वरूपातील अडथळ्यांनी ग्रासले आहे.

The technological barriers to the 20th livestock census process | २० व्या पशुगणना प्रक्रियेतील तांत्रिक अडथळे दूर होईना!

२० व्या पशुगणना प्रक्रियेतील तांत्रिक अडथळे दूर होईना!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यभरात जानेवारी महिन्यापासून सुरू असलेल्या २० व्या पशुगणनेला तांत्रिक स्वरूपातील अडथळ्यांनी ग्रासले आहे. इंटरनेटसाठी लागणारे गतिमान नेटवर्क आणि दिल्ली येथील एकमेव ‘सर्व्हर’मध्ये वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांमुळे पशुगणना प्रक्रिया मुदतीत पूर्ण झाली नाही. त्यामुळे या प्रक्रियेस पुन्हा १० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये प्रत्येक पाच वर्षानंतर आॅक्टोबर महिन्यात संदर्भदिनाचे औचित्य साधून पशुगणनेला सुरुवात केली जाते; मात्र यंदाची पशुगणना तब्बल चार महिने विलंबाने सुरू करण्यात आली. जानेवारी २०१९ पासून हाती घेण्यात आलेल्या या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या प्रगणकांना मुख्य ‘सर्व्हर’कडे माहिती आॅनलाइन पद्धतीने पाठविण्याकरिता ‘टॅब’ पुरविण्यात आले; मात्र ‘टॅब’ सदोदित कार्यक्षम राहण्याकरिता लागणाºया इंटरनेट कनेक्शनमध्ये वेळोवेळी व्यत्यय निर्माण होणे, मुख्य सर्व्हर अधूनमधून बंद राहणे, आदी कारणांमुळे आधी ३१ मार्च आणि त्यानंतर ३० एप्रिल या वाढवून दिलेल्या अंतिम मुदतीपर्यंतही पशुगणनेचे काम पूर्ण होऊ शकले नाही. यामुळे राज्य शासनाच्या मागणीवरून केंद्र शासनाने पुन्हा एकवेळ या प्रक्रियेस १० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

पशुगणनेचे काम चोखपणे व्हावे, यासाठी प्रत्येक गावामधील पशुपालकांच्या घरी भेट देऊन जनावरांची आकडेवारी घ्यावी लागते. ही माहिती ‘आॅनलाइन’ पद्धतीने ‘सर्व्हर’कडे पाठवावी लागत असून, काही तांत्रिक अडचणींमुळे त्यास विलंब लागत आहे.
- भुवनेश बोरकर
जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त, वाशिम.

 

Web Title: The technological barriers to the 20th livestock census process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम