तहसीलदार किशोर बागडे निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:39 AM2021-03-24T04:39:40+5:302021-03-24T04:39:40+5:30
याबाबत महसूल व वनविभागाचे अवर सचिव यांनी ३ मार्चला दिलेल्या आदेशानुसार किशोर बागडे, तहसीलदार मंगरुळपीर यांनी माहे ...
याबाबत महसूल व वनविभागाचे अवर सचिव यांनी ३ मार्चला दिलेल्या आदेशानुसार किशोर बागडे, तहसीलदार मंगरुळपीर यांनी माहे ऑक्टोबर २०१९ मधील नैसर्गिक आपत्ती वाटपामध्ये केलेल्या अनियमिततांच्या अनुषंगाने त्यांना शासन सेवेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, अमरावती यांनी २५.११.२०२० रोजीच्या पत्रान्वये शासनास सादर केला आहे . त्याअर्थी आता या आदेशान्वये किशोर बागडे, तहसीलदार मंगरुळपीर, यांना महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपिल ) नियम , १ ९ ७ ९ च्या नियम ४ ( १ ) ( अ ) मधील तरतुदीनुसार या आदेशान्वये निलंबित करण्यात येत असून , पुढील आदेश काढले जाईपर्यंत ते निलंबित राहणार असल्याचा आदेश देण्यात आला. निलंबन कालावधीत बागडे यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे असेल व त्यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांच्या पूर्व संमत्तीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. १६ मार्च रोजी विभागीय आयुक्त, अमरावती यांनी याबाबत जिल्हाधिकारी, वाशीम यांना पत्र दिले असून किशोर बागडे, तहसीलदार , मंगरुळपीर यांना शासन आदेशान्वये शासन सेवेतून निलंबित करण्यात आले.