तहसीलदार- नायब तहसीलदार संघटनेचे आंदोलन

By admin | Published: December 16, 2014 12:04 AM2014-12-16T00:04:43+5:302014-12-16T00:04:43+5:30

वरुड तहसीदाराला मोर्शीच्या आमदाराने अपमानास्पद वागणूक दिल्याच्या घटनेचा तहसीलदार संघटनेद्वारे निषेध.

Tehsildar-nayab tehsildar organization movement | तहसीलदार- नायब तहसीलदार संघटनेचे आंदोलन

तहसीलदार- नायब तहसीलदार संघटनेचे आंदोलन

Next

वाशिम : वरुड तहसीदाराला मोर्शीच्या आमदाराने अपमानास्पद वागणूक दिल्याच्या घटनेचा अमरावती विभागातील तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेने निषेध केला. वाशिम जिल्हय़ातही तहसीलदार व नायब तहसीलदारांनी काळय़ा फिती लावून कामकाज केले. वरुड तहसील कार्यालयात १२ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या बैठकीत खचलेल्या विहिरींचे सर्व पंचनामे मंजूर का केले नाहीत, असे म्हणून मोर्शी मतदारसंघाच्या आमदारांनी वरुड तहसीलदाराला शिवीगाळ करीत धमकी दिली. या घटनेचा निषेध म्हणून अमरावती विभागात तहसीलदार-नायब तहसीलदार संघटनेने आंदोलन पुकारले आहे. वाशिम जिल्हय़ात काळय़ा फिती लावून तहसीलदार-नायब तहसीलदारांनी कामकाज केले. यावेळी आमदारांविरुद्ध धमकी प्रकरणी विभागातील आयुक्त व जिल्हाधिकारी अमरावती यांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Tehsildar-nayab tehsildar organization movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.