सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? १५ दिवसांपासून पावसाची दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:25 AM2021-07-05T04:25:30+5:302021-07-05T04:25:30+5:30

वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९. मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. त्यात वाशिम तालुक्यात ८९३.७, रिसोड तालुक्यात ८०८.१, ...

Tell me, Bholanath, will it rain? It has been raining for 15 days | सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? १५ दिवसांपासून पावसाची दडी

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? १५ दिवसांपासून पावसाची दडी

googlenewsNext

वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९. मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. त्यात वाशिम तालुक्यात ८९३.७, रिसोड तालुक्यात ८०८.१, मालेगाव तालुक्यात ७८४.०, मंगरुळपीर तालुक्यात ७३१.८, मानोरा तालुक्यात ७१३.९, कारंजा तालुक्यात ७२२.६, मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. गतवर्षी जिल्ह्यात १ जून ते ४ जुलैदरम्यानच्या कालावधीत २९३.८ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. हे प्रमाण सरासरीच्या १४८.८ टक्के होते. यंदा याच कालावधीत २४१.८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण १४८.५ टक्के आहे. अर्थात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पिके डोलदार असणे अपेक्षित आहे; परंतु पावसाचे प्रमाण सार्वत्रिक आणि सारखे नसून, गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आता पिके संकटात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

-----------------------

३) कपाशीचा पेरा वाढला

जिल्ह्यात खरीप पिकांच्या सरासरी क्षेत्रात ७५ टक्के प्रमाण सोयाबीनचे असल्याने यंदाही जिल्ह्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचाच आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र कपाशीचे क्षेत्र वाढले आहे. कडधान्यात तूर पिकाचे क्षेत्र वगळता उडीद, मूग या पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. शिवाय तृणधान्यात ज्वारी, बाजरी, मका या पिकांच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून स्पष्ट होत आहे.

----------------------

४) ...तर दुबार पेरणी

गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा पत्ताच नसल्याने पिके संकटात सापडली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी तुषार किंवा ठिबक पद्धतीने सिंचन करून पिके वाचवित आहेत; परंतु जिल्ह्यात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र ७० टक्क्यांहून अधिक आहे. त्यातही हलक्या प्रतीच्या जमिनीचे प्रमाणही लक्षणीय असून, येत्या चार दिवसांत जोरदार पाऊस न पडल्यास १० हजारांवर क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

------------

५) देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो?

१) कोट: दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. कधी अतिवृष्टी, तर कधी अवर्षणामुळे पिकांचे नुकसान होते. कधी निकृष्ट बियाण्यांचाही फटका बसतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे आता शेती व्यवसायच नकोसा झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली आहेत.

- जगदीश आरेकर,

शेतकरी इंझोरी

--------------------

२) कोट: आमचा प्रमुख व्यवसाय शेतीच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत आहोत. यंदाही पावसाने आपल्या लहरीपणाचा प्रत्यय दिला असून, १५ दिवसांपासून पावसाचा पत्ताच नसल्याने आता पिके सुकण्याच्या स्थितीत आहेत. त्यात सुरुवातीला पेरलेले सोयाबीन, तूर आणि कपाशीच्या पिकाची स्थिती खूपच वाईट आहे.

- दिगंबर पाटील उपाध्ये,

शेतकरी, काजळेश्वर

---------------

६) कृषी अधिकाऱ्यांचा कोट

१) कोट: जिल्ह्यातील खरिपाची पेरणी ९८ टक्के आटोपली आहे. पावसाने खंड दिला असला तरी, पिकांची स्थिती सद्यस्थितीत समाधानकारक आहे. पुढे आणखी पावसाचा खंड कायम राहिल्यास मात्र हलक्या प्रतीच्या जमिनीतील पिकांना धोका आहे.

७) दोन कॉलम फोटो (शेतात पिके कोमेजू लागल्याचा फोटो)

बॉक्स: जिल्ह्यातील सध्याची स्थिती

आतापर्यंत अपेक्षित पाऊस - १९७.८ मि.मी.

---------

प्रत्यक्ष झालेला पाऊस - २४१.० मि.मी.

-------------

आतापर्यंत झालेली पेरणी - ३,८०, २७२ हेक्टर

---------

बॉक्स: कोणत्या तालुक्यात किती पाऊस

तालुका - पाऊस (मि.मी.) - पेरणी

वाशिम -२१५.६ - ८०२८४

रिसोड - २४०.४ - ६१,९४५

मालेगाव - २३८.२ - ५८,२१०

मं.पीर -३०४.९ - ५४, १३०

मानोरा -३०८.३ - ६४, २८१

कारंजा -१६७.० ७८,४३२

---------------------------

Web Title: Tell me, Bholanath, will it rain? It has been raining for 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.