वाशिमच्या वातावरणातील गारवा झाला कमी; दोन दिवसात ४.२ अंशाने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 02:42 PM2019-01-02T14:42:13+5:302019-01-02T14:42:35+5:30
बुधवारी वातावरणातील गारवा कमी होत ४.२ अंशाने तापमान वाढून पारा १२ अंशावर स्थिरावल्याने नागरिकांना बहुतांशी दिलासा मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गारव्यामुळे वाशिम जिल्ह्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळित झाले होते. मात्र, बुधवारी वातावरणातील गारवा कमी होत ४.२ अंशाने तापमान वाढून पारा १२ अंशावर स्थिरावल्याने नागरिकांना बहुतांशी दिलासा मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
उत्तर भारतात पसरलेल्या थंडीच्या लाटेमुळे विदर्भातील जिल्ह्यांवरही परिणाम होत गेल्या काही दिवसांपासून तापमानाने अगदीच निच्चांकी पातळी गाठली होती. त्यात वाशिमही अपवाद राहिले नाही. जिल्हाभरात कडाक्याच्या थंडीची अक्षरश: लाट पसरल्याने नागरिकांचे दैनंदिन कामांचे वेळापत्रक विस्कळित होवून थंडीपासून बचावासाठी सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास ठिकठिकाणी शेकोट्या पेटताना दिसून आल्या. दरम्यान, वाशिमचा पारा मंगळवारी ७.८ अंश नोंदविला गेला. मात्र, त्यात बुधवारी समाधानकारक वाढ होत पाºयाने १२ अंशाचा पल्ला गाठला. निरभ्र आकाश आणि प्रखर सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील थंडी कमी झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.