अवयवदानासाठी दहा जणांनी भरले अर्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 08:20 PM2017-09-08T20:20:35+5:302017-09-08T20:20:45+5:30

वाशिम - अवयवदान संकल्प अभियान सुरू असून, या अभियानांतर्गत दहा जणांनी अर्ज भरले आहेत. यासाठी छावा संघटनेच्या पदाधिकाºयांनी विशेष पुढाकार घेतला. अवयवदानाचा संकल्प करण्यासंदर्भात आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जात आहे.

Ten applicants filled up the organ for the organ! | अवयवदानासाठी दहा जणांनी भरले अर्ज !

अवयवदानासाठी दहा जणांनी भरले अर्ज !

Next
ठळक मुद्देअवयवदान संकल्प अभियान छावा संघटनेच्या पदाधिका-यांनी घेतला विशेष पुढाकार 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - अवयवदान संकल्प अभियान सुरू असून, या अभियानांतर्गत दहा जणांनी अर्ज भरले आहेत. यासाठी छावा संघटनेच्या पदाधिकाºयांनी विशेष पुढाकार घेतला.
अवयवदानाचा संकल्प करण्यासंदर्भात आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जात आहे. आरोग्य विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत छावा संघटनेच्यावतीने स्थानिक शिवाजी चौक येथे घेण्यात आलेल्या अवयवदान संकल्प अभियानात दहा जणांनी अवयवदान संकल्पाचे अर्ज भरुन दिले. या कार्यक्रमाला प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, मानसोपचार तज्ञ रविंद्रकुमार अवचार यांची उपस्थिती होती. यावेळी रामभाऊ शिंदे, प्रल्हाद भगत, तुकाराम डोंगरदिवे, अनिल कोरडे, गणेश गांजरे, सुर्यभान इंगळे, दिलीप भालेराव, रामेश्वर खडसे, नामदेव कांबळे, सचिन सातव आदी दहा जणांनी अवयवदान नोंदणीचे रितसर अर्ज भरुन दिले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन काळपांडे, गणेश गांजरे, मनिष डांगे, कोषाध्यक्ष संतोष घुगे, बेबीबाई धुळधुळे,  बेबी पडघाण, धनश्री खंडेराव, विजयश्री खंडेराव, वंदना अक्कर आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Ten applicants filled up the organ for the organ!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.