दहा दिवसीय कुंभार समाज सशक्तीकरण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:44 AM2021-03-09T04:44:37+5:302021-03-09T04:44:37+5:30

कुंभार समाजातील बचत गटांना इलेक्ट्रॉनिक चाकांचे वितरण वाशिम : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या पुढाकारातून, तसेच अखिल भारतीय कुंभार ...

Ten-day Potter Society Empowerment Program | दहा दिवसीय कुंभार समाज सशक्तीकरण कार्यक्रम

दहा दिवसीय कुंभार समाज सशक्तीकरण कार्यक्रम

googlenewsNext

कुंभार समाजातील बचत गटांना इलेक्ट्रॉनिक चाकांचे वितरण

वाशिम : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या पुढाकारातून, तसेच अखिल भारतीय कुंभार समाज विकास संस्था व संत गोरोबाकाका बचत गटाच्या सहयोगातून येथील मंगरुळपीर रोडवरील जागमाथा येथील मंदिराजवळ दहा दिवसीय कुंभार समाज सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गत मातीकाम कला प्रशिक्षण घेण्यात आले. २३ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत झालेल्या या प्रशिक्षणामध्ये जिल्हयातील कुंभार समाजातील बचत गटांनी सहभाग घेतला होता. ४ मार्च रोजी समारोपीय कार्यक्रमात सहभागी बचत गटांना तब्बल ४० इलेक्ट्रॉनिक चाकाचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी कुंभार समाज विकास संस्था सचिव रमेश चिल्लोरे हे तर उद्घाटक म्हणून प्रदीप गुजरे यांची उपस्थिती होती, तर मार्गदर्शक म्हणून उमरखेड येथील संजय पसळकर यांच्यासह कुंभार समाजबांधवांची उपस्थिती होती. यावेळी प्रशिक्षण घेतलेल्या बचत गटांना संजय पळसकर व मान्यवरांच्या हस्ते इलेेक्ट्रॉनिक चाकाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला खादी ग्रामोद्योग विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कुंभार समाज बांधव आणि बचत गटातील सदस्यांची उपस्थिती होती.

Web Title: Ten-day Potter Society Empowerment Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.