मंगरुळपीर तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकल्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 08:26 PM2017-09-08T20:26:19+5:302017-09-08T20:26:29+5:30
वाशिम : तांत्रिक अडचणीमुळे मंगरुळपीर तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : तांत्रिक अडचणीमुळे मंगरुळपीर तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
महाराष्टÑ राज्य निवडणुक आयोग यांनी १ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०१७ कार्यक्रम जाहीर केला होता. मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका २०१७ अंतर्गंत ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार होत्या. परंतु तांत्रिक अडचणीमुळे मंगरुळपीर तालुकयातील माळशेलु, जनुना, कोळंबी, पोटी, अरक, गोलवाडी, कळंबा, सावरगाव, नांदगाव, पिंपळगाव या दहा ग्रामपंचायतीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मंगरुळपीरचे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी यांनी दिली.