शिवीगाळ, मारहाण प्रकरणी दोन गटांतील दहाजणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:41 AM2021-07-29T04:41:43+5:302021-07-29T04:41:43+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोटी येथील फिर्यादीने तक्रार दिली की, २८ जुलै रोजी आरोपी प्रशांत गावंडे, बाबूलाल गावंडे, सुभाष गावंडे, ...

Ten persons from two groups have been booked in a case of abusive and assault | शिवीगाळ, मारहाण प्रकरणी दोन गटांतील दहाजणांवर गुन्हा दाखल

शिवीगाळ, मारहाण प्रकरणी दोन गटांतील दहाजणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोटी येथील फिर्यादीने तक्रार दिली की, २८ जुलै रोजी आरोपी प्रशांत गावंडे, बाबूलाल गावंडे, सुभाष गावंडे, नीलेश गावंडे, अतुल गावंडे, योगेश गावंडे यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून जागेच्या वादातून फिर्यादीस मारहाण करून वाईट उद्देशाने फिर्यादीचे पत्नीचा हात पकडून विनयभंग केला व जिवे मारण्याची धमकी दिली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३२३, ३५४, १४३, १४७ ,१४८, १४९, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या गटातील फिर्यादी अतुल गावंडे यांनी तक्रार दिली की, २८ जुलै रोजी आरोपी श्रीकांत सुडके, मोहन सुडके व दोन महिलांनी संगनमत करून सरकारी गल्लीतून जात असताना फिर्यादीचा सरकारी रस्ता अडवून शिवीगाळ केली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३४१, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महादेव सोळंके करीत आहेत.

Web Title: Ten persons from two groups have been booked in a case of abusive and assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.