पाण्यात बुडून दहा वर्षीय मुलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 17:17 IST2019-09-22T17:17:25+5:302019-09-22T17:17:31+5:30
दहा वर्षे वयाच्या चिमुकल्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

पाण्यात बुडून दहा वर्षीय मुलीचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : तालुक्यातील हिरंगी येथील दहा वर्षे वयाच्या चिमुकल्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, रामदास बबन भोसले (रा. हिरंगी) पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की त्यांची भाची अविना अरूण पवार ही गावातील बंदीमध्ये जळतण आणण्याकरिता गेली होती. यादरम्यान गावातीलच एका महिलेने तुमची भाची खदानीत साचलेल्या पाण्यात पाय घसरून पडल्याची माहिती दिली. घटनास्थळी जाऊन पाहिले असता अविनाचा बुडून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. अशा फिर्यादीवरून मालेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास हाती घेतला आहे.