दोन दिवसात संपणार रिसोड बाजार समितीचा कार्यकाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 03:26 PM2020-09-19T15:26:41+5:302020-09-19T15:26:50+5:30
संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार की प्रशासकाची नियुक्ती होणार, यावर सध्या चर्चा रंगत असल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालकमंडळाचा पाच वर्षाचा कार्यकाळ २२ सप्टेंबर २०२० रोजी पूर्ण होणार असून, संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार की प्रशासकाची नियुक्ती होणार, यावर सध्या चर्चा रंगत असल्याचे दिसून येते.
वाशिम जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून रिसोडकडे पाहिले जाते. रिसोड तालुक्यात कोणतीही निवडणूक म्हटली की दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागले. पाच वर्षांपूर्वी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत माजी पदाधिकाºयाच्या पॅनलने विद्यमान पदाधिकाºयांच्या पॅनलचा पराभव केला होता. १८ पैकी १७ संचालक विजयी झाले होते तर विरोधी पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. बाजार समितीचे १८ संचालक असून, २२ सप्टेंबर रोजी विद्यमान संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता निवडणूक विभागाने तुर्तास तरी निवडणूका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे रिसोड बाजार समितीच्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार की प्रशासकाची नियुक्ती होणार यावर सध्या सहकार व राजकीय क्षेत्रात चर्चा रंगत आहे. विरोधी गटातील काही तज्ज्ञांच्या मते प्रशासक नियुक्त होणार तर काहींच्या मते मुदतवाढ मिळणार. नेमके काय होणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.