धनज ग्रामपंचायतीची मुदत तीन दिवसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:30 AM2021-06-02T04:30:40+5:302021-06-02T04:30:40+5:30
धनज बु. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ११ आहे. गत पंचवार्षिकसाठी जून २०१६ मध्ये या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. ...
धनज बु. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ११ आहे. गत पंचवार्षिकसाठी जून २०१६ मध्ये या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. आता विद्यमान ग्रामपंचायतचा कार्यकाळ ४ जून रोजी संपुष्टात येणार आहे. नव्या ग्रामपंचायतीची निवडणूक आवश्यक आहे. तथापि, जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता निवडणूक घेणे अशक्य आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार चालविण्याची सूत्रे ही प्रशासकाच्या हाती देण्यात येतील की, विद्यमान ग्रामपंचायतीला मुदतवाढ देतील याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. कारण ग्रामपंचायतीचा पर्यायी गावाचा विकास व नागरिकांच्या समस्या सोडवून सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता ग्रामपंचाय तीचा गाडा चालविणे गरजेचे आहे.
.......
ज्या ग्रामपंचायतचा कार्यकाल संपुष्टात आलेला आहे किंवा संपुष्टात येणार आहे अशा ग्रामपंचायतीच्या निवडणूक घेण्याविषयी आमच्याकडे अजूनपर्यंत कुठले आदेश आलेले नाहीत.
धिरज मांजरे , तहसीलदार कारंजा
............
कारंजा तालुक्यातील किन्हीरोकडे , वाई, काजळेश्वर या तीन ग्रामपंचायतचा कार्यकाल हा जानेवारी महिन्यात संपला आहे. तर धनज बु. ग्रामपंचायतचा कार्यकाल हा ४ जूनला संपणार आहे.