"टोकन’साठी विविध अटींचे बंधन
By admin | Published: May 16, 2017 01:41 AM2017-05-16T01:41:53+5:302017-05-16T01:41:53+5:30
वाशिम : ग्रेडर व गोदामाचे नियोजन झाल्यानंतर आता नाफेड केंद्रावर तूर खरेदीला सुरूवात झाली. शेतकऱ्यांना ‘टोकन’ घेण्यासाठी विविध अटींची पुर्तता करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रेडर व गोदामाचे नियोजन झाल्यानंतर आता नाफेड केंद्रावर तूर खरेदीला सुरूवात झाली. शेतकऱ्यांना ‘टोकन’ घेण्यासाठी विविध अटींची पुर्तता करावी लागत आहे.
मुख्यमंत्री व राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांकडील शिल्लक तुरदेखील नाफेडमार्फत मार्केटींग फेडरेशनकडून ३१ मे पर्यंत खरेदी केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ‘टोकन’ दिले जात आहे. या टोकनमध्ये वाहन क्रमांक नोंदविल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या तुरीचे वजन त्या वाहनावरील क्रमांकानुसार केले जाणार आहे, अशी माहिती आहे. यबाबतची नोंद रजिष्टरमध्ये करावी, शेतकऱ्यांचे नाव आधारकार्ड, ओळखपत्र, ७/१२, पिकपेरा नोंद, इत्यादी माहितीची कागदपत्रे घ्यावीत अशा सूचना उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या आहेत. काही ठिकाणी तालुक्याचे बंधन असल्याने अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.