कोरोनाबाधितांच्या संपर्कातील प्रत्येकाची चाचणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:43 AM2021-04-02T04:43:51+5:302021-04-02T04:43:51+5:30
जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच कोरोना संसर्गामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींचे लसीकरण लवकरात ...
जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच कोरोना संसर्गामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व नगर परिषद, नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने व समन्वयाने काम करावे. प्रत्येक शहर व गावनिहाय लसीकरणास पात्र व्यक्तींची यादी तयार करून ग्रामपंचायत कार्यालयात लावावी. महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत कार्यरत महिला बचतगटांच्या साहाय्याने लसीकरण व कोरोना चाचण्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
.......................
अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा
कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील प्रत्येकाची कोरोना चाचणी होणे आवश्यक आहे. यामध्ये कोणीही अडथळा निर्माण केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. तसेच गृह विलगीकरणाचे नियम न पाळणाऱ्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणमध्ये ठेवावे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी सांगितले.