१३ बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:39 AM2021-03-08T04:39:00+5:302021-03-08T04:39:00+5:30
कामरगाव : गेल्या २० दिवसांपासून कामरगाव परिसरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यात शनिवारी गावातील १३ व्यक्ती बाधित असल्याचे ...
कामरगाव : गेल्या २० दिवसांपासून कामरगाव परिसरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यात शनिवारी गावातील १३ व्यक्ती बाधित असल्याचे निदान झाल्यानंतर या बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी आरोग्य विभागाने सुरू केली.
----------------
धनज परिसरात १५ बाधित
धनज बु.: परिसरात कोरोना संसर्ग नियंत्रणात येण्याची चिन्हे दिसत असून, शनिवारी रामटेक येथील ११, हिंगणवाडी येथील १, धनज बु. येथील २, पिंप्री मोडक येथील १, व्यक्ती मिळून १५ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले.
----------------
मेहा येथील दोघांची कोरोनावर मात
धनज बु: गत १५ दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झालेल्या दोन व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना विलगीकरणात ठेवून आरोग्य विभागाने त्यांच्यावर नियमित उपचार केले. त्यांनी कोराेनावर मात केल्याने त्यांचा विलगीकरण कालावधी रविवारी संपला.
-----------------
प्रकट दिन उत्सव साध्या पद्धतीने
धनज बु.: परिसरात वाढत असलेला कोरोना संसर्ग आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करून धनज परिसरातील विविध मंदिरात शुक्रवारी गजानन महाराजांचा प्रकट दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.