बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:42 AM2021-05-09T04:42:26+5:302021-05-09T04:42:26+5:30

धनज बु. : येथून जवळच असलेल्या भिवरी येथे गुरुवारी काही व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान होताच आरोग्य विभागाने बाधितांच्या संपर्कातील ...

Testing of persons in contact with victims | बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी

बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी

Next

धनज बु. : येथून जवळच असलेल्या भिवरी येथे गुरुवारी काही व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान होताच आरोग्य विभागाने बाधितांच्या संपर्कातील २५ पेक्षा अधिक व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची कोरोना चाचणी करून घेतली.

0000000000000

मुख्य रस्त्यांवर वाहनांची तपासणी

कारंजा : अमरावती जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता दोनद बु. येथे वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. या माध्यमातून शनिवारीदेखील ४० पेक्षा अधिक वाहनांची तपासणी पोलिसांकडून करण्यात आली.

000000000000000

रिक्त पदांमुळे तपासणीत अडचणी

वाशिम : परिसरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने कोरोना चाचणी वेगात करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत; परंतु आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात अडचणी येत आहेत.

0000000000000000

कोरोनामुळे प्रशिक्षण कार्य थांबले

वाशिम : मध्यंतरी कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटातून बहुतांशी दिलासा मिळाल्याने बचत गटातील महिलांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देणे सुरू करण्यात आले होते; मात्र आता पुन्हा हे संकट तीव्र झाल्याने जमावबंदी लागू करण्यात आली. यामुळे प्रशिक्षण कार्य थांबले आहे.

000000000000000000

आठवडाभरात पाच हजार चाचण्या

वाशिम : जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेत आरोग्य विभागाने कोरोना चाचणीवर भर दिला असून, गेल्या आठवडाभरात पाच हजारांपेक्षा अधिक व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी हजारांपेक्षा अधिक व्यक्ती बाधित आढळले आहेत.

00000000000000000

उड्डाणपुलानजीक वाहनांची तपासणी

वाशिम : शहरातून पुसदकडे जाणाऱ्या व शहरात येणाऱ्या सर्व वाहनांची उड्डाणपुलानजीक तपासणी केली जात आहे. शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी तैनात असून, विना मास्क प्रवास करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

000000000000000

शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट

वाशिम: जिल्हाधिकाऱ्यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ११ वाजेनंतर दुकाने उघडी ठेवण्यावर बंदी घातली आहे. तसेच ९ मे पासून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे वाशिम शहरातील सर्व रस्ते दुपारीच निर्मनुष्य होत असल्याने रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे.

00000000000000000

ऑटोचालकांवर उपासमारीची वेळ

वाशिम : कोरोनामुळे शाळा बंद झाल्या असून, सायंकाळी पाच वाजल्यानंतर दुकानेही बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. यामुळे मात्र प्रवासीच मिळत नसल्याने ऑटोचालकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.

00000000000000

जिल्हा रुग्णालयात पाण्याचा अभाव

वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. पाण्याचे फिल्टरही बंद पडले आहे. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष पुरविण्याची मागणी रुग्णांकडून जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे करण्यात आली आहे.

000000000000000

रस्त्यावर उभारले प्रवासी निवारे

शेलुबाजार : वाशिम ते शेलूबाजार हा नव्याने रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर पूर्वी असलेले प्रवासी निवारे तोडून नव्याने प्रवासी निवारे उभे करण्यात आल्याने प्रवाशांना सोयीचे झाले आहे.

0000000000000

घरकुलांची कामे अपूर्ण

कारंजा : काही लाभार्थींच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने कारंजा तालुक्यातील २०८ घरकुलांची कामे अपूर्ण राहिली आहेत. अनेकांनी त्रुटी दूर केल्या असतानाही मात्र अद्याप त्यांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागला नाही.

000000000000000

रामटेक मार्गावरील पूल अर्धवट

कारंजा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कारंजा तालुक्यातील हिंगणवाडी ते रामटेक या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत रखडले आहे. शिवाय या मार्गावर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे कामही अर्धवट आहे. त्यामुळे वाहनचालकांना अडचणी येत आहेत.

Web Title: Testing of persons in contact with victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.