शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ
By admin | Published: January 6, 2017 07:24 PM2017-01-06T19:24:16+5:302017-01-06T19:24:16+5:30
शासनाच्या हमीभावानुसार कापसाची खरेदी करण्यासाठी सुरू केलेल्या शासकीय खरेदी केंद्राला दोन महिन्यांत कापसाचे बोंडही खरेदी करता आले नाही.
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 6 - शासनाच्या हमीभावानुसार कापसाची खरेदी करण्यासाठी सुरू केलेल्या शासकीय खरेदी केंद्राला दोन महिन्यांत कापसाचे बोंडही खरेदी करता आले नाही. शासनाकडून जाहीर मीभावापेक्षा जवळपास दीडपट भाव खासगी बाजारात मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय केंद्राकडे पाठ केली आहे. आता यंदा मागील वर्षाच्या तुलनेत चांगला पाऊस पडला असला तरी कपाशीचे क्षेत्र मात्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. कपाशीसाठी मोठे परीश्रम घेऊनही या पिकाला अपेक्षीत भाव मिळत नसल्याने शेतकºयांनी या पिकाकडे पाठ केली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ३० हजार ८५७ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली होती; परंतु यंदा केवळ १८ हजार ६३० हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला.
मागील वर्षाप्रमाणच ९० टक्के क्षेत्र हे कारंजा आणि मानोºयातच आहे. यंदा १८ हजार ६३० हेक्टरमधील ११ हजार १०० हेक्टरवर क्षेत्र कारंजात, तर ६ हजार २०१ हेक्टर क्षेत्रावर मोनोऱ्यात कपाशीचा पेरा झाला. त्यावरून इतर तालुक्यात कपाशीची पेरणी नावापुरतीच झाल्याचे स्पष्ट होते. उत्पादन कमी असल्यामुळे मागणी अधिक आहे; परंतु शासनाने जाहीर केलेले ४ हजार १६० रुपये क्विंटलचे तोकडे दर कापूस उत्पादक शेतकºयांच्या मुळावर घाव करणारे ठरले. शासनाच्या हमीभावापेक्षा जेमतेम ८०० रुपये अधिक भाव देऊ व्यापाºयांनी कपाशीची खरेदी सुरू केली. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर येथे १६ नोव्हेंबर २०१६ रोजी सीसीआयमार्फत कापसाच्या शासकीय खरेदीची सुरुवात करण्यात आली तरी, ६ जानेवारी २०१७ पर्यंत या ठिकाणी कपाशीच्या बोंडाचीही खरेदी होऊ शकली नाही. तोकडे हमीभाव जाहीर केल्यानंतर केवळ नावापुरते शासकीय कापूस खरेदी केंंद्र सुरू करून शासनाने जणू शेतकºयांची थट्टाच चालविली आहे, असे मत शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे. दरम्यान, हंगाम संपत आला असताना आता कपाशीला व्यापाºयांकडून जवळपास सहा हजार रुपये प्रति क्विंटलचे भाव मिळत आहेत.