पुरात पूल गेला वाहून, महिनाभरापासून १५ गावांची वाहतूक प्रभावित
By दादाराव गायकवाड | Published: August 30, 2022 07:11 PM2022-08-30T19:11:14+5:302022-08-30T19:11:54+5:30
कुंभी-वाशिम मार्गावरील ग्रामस्थांची जीवघेणी कसरत
वाशिम : जिल्ह्यात ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील कुंभी-वाशिम या मार्गावरील वारा जहांगीर जवळील पूस नदीला पूर आल्याने पूल वाहून गेला. वाहून गेलेल्या पुलामुळे १५ गावातील वाहतूक प्रभावित झाली असून, कुंभी-वाशीम मार्गावरील ग्रामस्थांची जीवघेणी कसरत होत आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील कुंभी-वाशिम या मार्गावरील वारा जहांगीर जवळील पूस नदीला पूर आल्याने पूल वाहून गेला. परंतु, महिना संपत असतानाही या पुलाची साधी दुरूस्ती झाली नाही. यामुळे परिसरातील वारा जहांगिर, देपुळ, कुंभी, वारा, उमरा, कुंभी, आसेगाव, लही, वटफळ, पिंपळगांव, चिंचखेड, देपुळ, सारसी अशा १५ पेक्षा अधिक गावांची वाहतूक प्रभावित झाली असून, शाळेत जाणारे विद्यार्थी, रुग्ण व ग्रामस्थ जीव धोक्यात घालून पुलाचा खचलेल्या भागावरून प्रवास करीत असल्याचे चित्र दरदिवशी पाहायला मिळत आहे.