चांदण्याचं जोंधळं शेतात फुलणार; १२ हजार शेतकऱ्यांना शेतविहिरी

By दिनेश पठाडे | Published: November 1, 2023 12:29 PM2023-11-01T12:29:14+5:302023-11-01T12:29:22+5:30

दोन विहिरींच्या अंतराबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना

The moonlight will bloom in the fields; Field wells for 12 thousand farmers | चांदण्याचं जोंधळं शेतात फुलणार; १२ हजार शेतकऱ्यांना शेतविहिरी

चांदण्याचं जोंधळं शेतात फुलणार; १२ हजार शेतकऱ्यांना शेतविहिरी

वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. वैयक्तिक सिंचन विहिरीच्या अनुदानात वाढ करुन ४ लाख करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी जिल्ह्यातील १२ हजार शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्याचे उद्दिष्ट रोहयो विभागाला दिले आहे.

रोजगार हमी योजनेच्या अनुदान वाढ करण्याबरोबरच इतर अटी देखील काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय राज्याच्या रोहयो विभागाने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. याबाबत अधिक स्पष्टता यावी तसेच ग्रामीण पातळीवर होणारा संभ्रम दूर व्हावा, यासाठी जिल्हा रोहयो विभागाने नुकत्याच सुधारित सूचना निर्गमित केल्या आहेत. यामध्ये दोन सिंचन विहिरीतील अंतराबाबतची माहितीचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. रोहयो अंतर्गत विहीर मंजूर करताना इतर कोणत्याही विहिरींपासून दीडशे मीटर अंतराची अट लागू नसेल या निर्णयात बदल करण्यात आला असून त्याऐवजी दोन शासकीय विहिरींमध्ये दीडशे मीटर अंतर असणे आवश्यक आहे. फक्त खासगी विहीर असेल तर दीडशे असेल तरच दीडशे मीटर अंतराची अट लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

अशा आहेत सुधारित  सूचना

पेजयल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात विहीर मंजूर करु नये अनुसूचित जाती व जमाती, दारिद्र्य रेषेखालील प्रवर्गातील कुटुंब व जलप्रवाह वहन क्षेत्र मध्ये येत असलेल्या कोणत्याही प्रवर्गासाठी दीडशे मीटर अंतराची अट लागू राहणार नाही. दोन शासकीय विहिरींमध्ये दीडशे मीटर अंतर असणे आवश्यक आहे.

Web Title: The moonlight will bloom in the fields; Field wells for 12 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.