वाशिममध्ये अंत्ययात्रा थांबवून सर्वांनी गायले राष्ट्रगीत; व्हिडिओची सर्वत्र चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 04:02 PM2022-08-17T16:02:38+5:302022-08-17T16:02:50+5:30
यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं देशात 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव' सुरु आहे.
मंगरुळपीर : मंगरुळपीर येथील किशोर विजय बाहेती यांच्या मातोश्री मोहिनिदेवी बाहेती यांचे वृद्धपकाकाने निधन झाले. त्यांच्यावर ता १७ ऑगस्ट रोजी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाने १७ ऑगस्ट रोजी सर्वांनी सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्याचे आवाहन केले असल्याने बाहेती यांच्या घरी अंत्ययात्रेत सामील होण्याकरिता उपस्थित नातेवाईक व नागरिकांनी अकरा वाजल्याने अंत्ययात्रा थांबवून राष्ट्रगीताचे गायन केले व त्यानंतरच अंत्ययात्रा सुरू झाली. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली व नातवंड असा आप्त परिवार आहे.
वाशिम- वाशिममधील मंगरुळपीरमध्ये अंत्ययात्रा थांबवून गायले राष्ट्रगीत; व्हिडिओची सर्वत्र चर्चा pic.twitter.com/FnrRILqvxs
— Lokmat (@lokmat) August 17, 2022
यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं देशात 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव' सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या 'स्वराज्य महोत्सवाचे' आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात आली. आज सकाळी 11 वाजता राज्यात सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन झालं. या राष्ट्रगीताच्या समूह गायनामध्ये राज्यातील सर्व अबाल-वृद्धांनी सहभाग घेतला.