पोलीस रात्री स्वत:हून आले नाही, मी त्यांना बोलविले होते; तीन तास बंद दाराआड चर्चेवर पूजा खेडकरांचे स्पष्टीकरण

By नंदकिशोर नारे | Published: July 16, 2024 03:41 PM2024-07-16T15:41:37+5:302024-07-16T15:45:36+5:30

रात्री पूजा खेडकर यांच्या निवासस्थानी महिला पोलीस अधिकारी आल्या होत्या. यावरून उलटसुलट चर्चा सुरु झाली होती.

The police did not come at night, I had called them; IAS Pooja Khedkar's explanation on the closed door discussion for three hours | पोलीस रात्री स्वत:हून आले नाही, मी त्यांना बोलविले होते; तीन तास बंद दाराआड चर्चेवर पूजा खेडकरांचे स्पष्टीकरण

पोलीस रात्री स्वत:हून आले नाही, मी त्यांना बोलविले होते; तीन तास बंद दाराआड चर्चेवर पूजा खेडकरांचे स्पष्टीकरण

वाशिम : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उपविभागीय पोलिस अधिकारी नीलिमा आरज व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी रात्री १० वाजेदरम्यान शासकीय विश्रामगह येथे जाऊन भेट घेतली. बंद दाराआड तब्बल तीन तास चर्चा चालली. यावेळी नेमकी कशासंदर्भात चर्चा झाली, यावरून सस्पेंन्स वाढला असला तरी पाेलिसांना मी बाेलाविल्याचे खेडकर यांनी स्पष्ट केले.
डॉ. च्या मिस पूजा, २०२० मध्ये ३० वर्षांच्या २०२३ मध्ये ३१; पूजा खेडकरांनी वयातही बनाव केला

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पूजा खेडकर यांची गेल्या वर्षी प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. प्रशिक्षण कालावधीदरम्यान विविध कारणांमुळे त्या वादात सापडल्या आहेत. त्यांना पुणे येथून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले होते. . १५ जुलै ते १९ जुलै दरम्यान पूजा खेडकर अकोला येथील आदिवासी विभागात प्रकल्प विकास अधिकारी कार्यालयात आठवडाभर कामकाजाचे प्रशिक्षण घेण्यासाठी रुजू होणार होत्या; परंतु त्यात ऐनवेळी बदल करण्यात आला असतानाच रविवारी रात्री १० वाजेदरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी नीलिमा आरज व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूजा खेडकर यांची बंद दाराआड चर्चा केली. तब्बल तीन तास चाललेल्या या चर्चेत नेमकी कशासंदर्भात बोलणी झाली, याबाबत उपविभागीय अधिकारी पोलिस अधिकारी नीलिमा आरज यांना संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. पूजा खेडकर आणि पोलिसात रात्री उशिरा झालेल्या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.

रातकाे पुलीस आयी नही थी, मैने बुलाया था
पूजा खेडकर यांची उपविभागीय पोलिस अधिकारी नीलिमा आरज व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी रात्री १० वाजेदरम्यान शासकीय विश्रामगृह येथे जाऊन भेट घेतली. याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. असे असले तरी याबाबत पूजा खेडकर यांनी पत्रकारांना माहिती देताना ‘रातकाे पुलीस आयी नही थी, मैने बुलाया था’ अशी प्रतिक्रिया दिली. माझ्या काही अडचणींसंदर्भात चर्चा करण्यासाठी बाेलावल्याचे त्यांनी सांगितले, परंतु अडचणी काय यावर मात्र त्यांनी पांघरूण घातले.

Web Title: The police did not come at night, I had called them; IAS Pooja Khedkar's explanation on the closed door discussion for three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.