विद्यार्थ्यांनी मुख्याधिकारींच्या दालनातच भरविली शाळा

By नंदकिशोर नारे | Published: September 19, 2022 05:41 PM2022-09-19T17:41:12+5:302022-09-19T17:42:11+5:30

कारंजा नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या उर्दू व मराठी माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकांची कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होत आहे. माध्यमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढ तत्वानुसार विद्यार्थ्यामध्ये व तुकडी संख्येत वाढ होत असते.

The students filled the school in the principal's hall | विद्यार्थ्यांनी मुख्याधिकारींच्या दालनातच भरविली शाळा

विद्यार्थ्यांनी मुख्याधिकारींच्या दालनातच भरविली शाळा

googlenewsNext

वाशिम :  कारंजा  येथील नगर परिषद मुलजीजेठा उर्दू माध्यमिक शाळेतील रिक्त पदे तातडीने भरण्याच्या मागणीसाठी पालकांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन १९ सप्टेंबर राेजी सकाळी ११.३० वाजता मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या दालनात शाळा भरवली.

कारंजा नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या उर्दू व मराठी माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकांची कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होत आहे. माध्यमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढ तत्वानुसार विद्यार्थ्यामध्ये व तुकडी संख्येत वाढ होत असते. सध्या विद्यार्थी व तुकडी संख्यानुसार काही विषयांचे शिक्षक सेवानिवृत्त, रजा, आदी कारणांमुळे कमी पडत आहे. 

मुख्याध्यापकांनी वेळोवेळी केलेल्या शिक्षक मागणीवरून व विद्यार्थ्यांचा हित जोपासून या शाळांमध्ये शासन निर्णयानुसार नियमित शिक्षक मिळेपर्यंत घड्याळी तासिका मानधनावर शिक्षक नेमणूक करावी. अशी मागणी माजी नगरसेवकांसह पालकांनी केली होती. मात्र या मागणीकडे शिक्षण विभागाने साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी साेमवारी सकाळी ११.३० वाजता विद्यार्थ्यांना घेऊन थेट नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनातच शाळा भरवली.

शिक्षक दो...शिक्षक दो विद्यार्थ्यांनी दिल्या घोषणा -
शैक्षणिक सत्राच्या सुरवातीपासूनच शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मात्र या कडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांनी चक्क मुख्याधिकारी यांच्या दालनात शाळा भरवली व शिक्षक दो, शिक्षक दो... अशी घोषणाबाजी करीत अधिकाऱ्यांसह शहरवासियांचे लक्ष वेधले हाेते.

Web Title: The students filled the school in the principal's hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.