मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार राहणार बंद; जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचे आदेश
By संतोष वानखडे | Published: April 22, 2024 06:44 PM2024-04-22T18:44:19+5:302024-04-22T18:44:26+5:30
गावांमध्ये भरविण्यात येणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार असून आठवडी बाजार अन्य दिवशी भरविण्यास हरकत नाही, असेही आदेशात नमूद केले.
वाशिम : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या मतदानाच्या दिवशी शुक्रवार २६ एप्रिल रोजी भरविण्यात येणारे आठवडी बाजार मतदानाच्या दिवशी बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी सोमवारी (दि.२२) जारी केले.
मार्केट अँड फेअर अॅक्ट १८६२ या कायद्याच्या कलम ५ (अ) नुसार मतदानाच्या दिवशी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या वाशिम, मंगरूळपीर, मानोरा व कारंजा तालुक्यातील तसेच अकोला लोकसभा मतदारसंघातील रिसोड व मालेगाव या तालुक्यामधील गावांमध्ये भरविण्यात येणारे बाजार बंद ठेवावे, असे आदेशात नमूद आहे.
वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर, उकळीपेन व कोकलगाव, मंगरूळपीर तालुक्यातील कुंभी, पारवा, कारंजा धामनी, पोहा, मानोरा तालुक्यातील भुली, हिवरा खुर्द, साखरडोह, पाळोदी, कारखेडा, असोला खुर्द, रिसोड तालुक्यातील गोवर्धन, वाकद, कु-हा, मालेगाव तालुक्यातील मुंगळा,मेडशी व करंजी या गावांमध्ये भरविण्यात येणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार असून आठवडी बाजार अन्य दिवशी भरविण्यास हरकत नाही, असेही आदेशात नमूद केले.