रानडुकराचा लोक वस्तीत हैदोस; तिघांवर हल्ला, दुचाकीही केली चकनाचूर

By दादाराव गायकवाड | Published: October 17, 2022 12:59 PM2022-10-17T12:59:35+5:302022-10-17T13:00:22+5:30

गावकऱ्यात दहशत: मानोरा तालुक्यातील घटना

the wild boar habitat three were attacked the two wheeler was also smashed in washim | रानडुकराचा लोक वस्तीत हैदोस; तिघांवर हल्ला, दुचाकीही केली चकनाचूर

रानडुकराचा लोक वस्तीत हैदोस; तिघांवर हल्ला, दुचाकीही केली चकनाचूर

googlenewsNext

वाशिम:  रानडुकरांनी आता आपला मोर्चा लोक वस्तीकडे वळवला आहे. मानोरा तालुक्यातील म्हसनी येथे भर दिवसा एका रानडुकराने लोक वस्तीत शिरून तिघांवर हल्ला केला, तसेच दुचाकीला वारंवार धडक देऊन दुचाकी चकनाचूर केली. रविवारी सायंकाळी सहा वाजता घडलेल्या घटनेमुळे गावकऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रानडुकरांचा हल्ल्यात मोतीराम पुंडलिक पाटील गंभीर जखमी, तर विजय भाकरे, सतीश धामदे  यांनाही चांगलीच दुखापत झाली आहे.

जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढतच आहे. आजवर शेतातील पिकात धुमाकूळ घालणाऱ्या वन्यप्राण्यांनी आता लोकवस्ती कडे धाव घेतली आहे. मानोरा तालुक्यातील इंझोरीसह परिसरात रानडुकरांचे कळप भरदिवसा शेतामधील पिकामध्ये घुसून प्रचंड नुकसान करून शेतकऱ्यांचे नुकसान करत असतानाच आता त्यांनी गावाकडेही मोर्चा वळविला आहे.  

रविवार १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास म्हसनी या गावात चक्क रानडुकराने प्रवेश करून वाटेत येणाऱ्या माणसांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. यामध्ये मोतीराम पाटील हे गंभीर जखमी झाला असून, त्यांना अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर विजय भाकरे व सतीश धामदे हे जखमी झाले आहेत, शिवाय सतिश धामंदे यांची दुचाकी चकनाचूर केली. म्हसनी येथे रानडुकराने तिघांना जखमी केल्याची घटना इंझोरी परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली असल्याने प्रत्येक गावामध्ये महिला, लहान बालकांसह ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त वनविभागाने करावा किंवा शिवारालगत कुंपण घालावे, अशी मागणी केल्या जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: the wild boar habitat three were attacked the two wheeler was also smashed in washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम