नववर्षात पालिकेचे नाट्यगृह जनसेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 02:31 PM2020-01-01T14:31:52+5:302020-01-01T14:32:18+5:30

थांबलेले सांस्कृतीक उपक्रम सुरु होत असल्याने नाटयप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

Theater for public service in New Year | नववर्षात पालिकेचे नाट्यगृह जनसेवेत

नववर्षात पालिकेचे नाट्यगृह जनसेवेत

Next

- नंदकिशोर नारे  
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नगरपालिकेच्या तिजोरीत पुरेसे पैसे नसल्याने अनेक वर्षापासून रखडलेले वाशिम शहरातील नाट्यगृह नव्या वर्षात जनसेवेत येणार आहे. याकरिता वाशिम नगरपरिषदेचे अध्यक्ष अशोक हेडा यांचे महत्प्रयास कामी आले. ८३५ आसन क्षमतेचे हे प्रस्तावित नाट्यगृह पूर्णत्वास आले असून शहरातील सांस्कृतिक उपक्रमांची अडचण यामुळे दूर होणार आहे. सध्या थांबलेले सांस्कृतीक उपक्रम सुरु होत असल्याने नाटयप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
नगरपालिकेने टेंम्पल गार्डननजिकच्या जागेत ८३५ आसन क्षमतेचे सर्व सुविधायुक्त नाट्यगृह प्रस्तावित केले आहे. अनेक वर्षापासून या नाटयगृहाचे काम सुरु आहे. परंतु नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी नगरपालिकेचा कारभार हाती घेतल्याबरोबर याला प्राधान्य देत काम पूर्णत्वाकडे नेले आहे. लवकरच याचे उदघाटन करण्यात येणार असल्याचे सांगून नाटयगृह जनसेवेत येणार असल्याचे हेडा यांनी सांगितले.
नाट्यगृह उभारणीसाठी लाखो रुपयांचे अनुदान मंजूर असून या नाट्यगृहाच्या आसन व्यवस्थेसाठी स्लोपिंग स्लॅब टाकला गेला असून उदघाटनाचा मुहूर्त पाहून लवकरच हे नाटयगृह जनसेवेत रुजू होणार आहे. या नाटयगृहामुळे संगीत मैफल, नाटक, भाव-भक्तीगीते मैफल व अन्य कार्यक्रम सुरू होऊन शहराला लाभलेला साहित्य, सांस्कृतीक कार्यक्रमाचा वसा कायम राहण्यास मदत होईल . विदर्भामध्ये सर्व सोयीयुक्त नाटयगृह वाशिमसारखे दुसरे नसणार असल्याचे हेडा यांनी सांगितले. याकरिता तज्ञांच्यावतिने मार्गदर्शन घेऊन हे नाटयगृह उभारण्यात येत आहे. तसेच तारांगणही लवकरच जनसेवेत रुजू होणार आहे.

नविन वर्षात शहरात उपलब्ध होणाऱ्या सुविधा

 शहरात सुरु असलेल्या ६ पुलांच्या कामापेैकी ३ कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये शिवाजी चौक, काळे फैल व जिल्हा सामान्य रुग्णालयसमोरील पुलाचा समावेश आहे. टिळक गार्डन , गोपाल टॉकीज व स्मशानभूमीसमोरील पुलाचे काम नविन वर्षात पूर्ण करण्याचा मानस.
 रस्ता झाडण्यासाठी नगरपालिकेच्यावतिने नव्याने रस्ता झाडण्याची (रोड स्विपिंग) मशिन आणण्यात आली असून नविन वर्षापासून या मशिनव्दारे रस्ते झाडण्यात येणार आहे.
 जेटींग -सक्शन मशिन उपलब्ध - या मशिनव्दारे भूमिगत गटार योजनेचे चेंबर स्वच्छ करण्याचे काम नविन वर्षापासून करण्यात येणार आहे.
 सिग्नल व सिसीटीव्ही कॅमेरे लागणार - वाशिम शहरातील अकोला नाका, पोलीस स्टेशन चौक, आंबेडकर चौक, पाटणी चौक व पुसद नाका येथे सुविधा नविन वर्षात राबविण्यात येणाार तसेच १० ठिकाणी ब्लिकर्स लाईटची व्यवस्था ४नगरपरिषदेच्यावतिने नवीन वर्षापासून शववाहिनी उपलब्ध करुन देणार आहे.
 नारायण बाबा तलावाचे सौदर्यीकरण करण्यात येणार आहे. तलाव संवर्धन व पर्यावरण योजनेंतर्गंत करण्यात येणार आहे. याकरिता साडेतीन करोड रुपये उपलब्ध झाले असून पैसाही नगरपालिकेकडे आला आहे.
 कचºयापासून खत निर्मिती प्रकल्प डम्पींग ग्राऊंडवर सुरु होणार

वाशिम शहरातील विकास झपाटयाने होत आहे. याकरिता जिल्हयातील नेत्यांचा, लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग, नगरसेवकांसह नागरिकांचे मार्गदर्शन लाभत आहे. शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपण कटीबध्द असून शहराला सिसीटीव्ही कॅमेरे व चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा लवकरच जोडल्या जाणार आहे.
-अशोक हेडा
नगराध्यक्ष, नगरपरिषद वाशिम

Web Title: Theater for public service in New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम