कोल्हापुरी बंधाऱ्याच्या लोखंडी गेटची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:40 AM2021-03-06T04:40:04+5:302021-03-06T04:40:04+5:30
पोलिसांकडून प्राप्त माहिती नुसार मंगरुळपीर लघू सिंचन विभागाचे अधिकारी राजू पांडुरंग डापसे यांनी फिर्यादीत असे नमूद केले आहे की, ...
पोलिसांकडून प्राप्त माहिती नुसार मंगरुळपीर लघू सिंचन विभागाचे अधिकारी राजू पांडुरंग डापसे यांनी फिर्यादीत असे नमूद केले आहे की, रोहणा येथील राजेंद्र पवार यांच्या शेत सर्व्हे क्रमांक ९६ मध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याचे २० लोखंडी गेट ठेवले होते. ३ मार्च रोजी शेत मालकाने फोन करुन सांगितले की, शेतातील धुऱ्यावर ठेवलेल्या लोखंडी गेट पैकी काही गेट येथे नाही यावरून पाहनी केली असता. त्या ठिकाणी ठेवलेल्या २०गेट पैकी १७ गेट दिसून आले नाही. यात प्रत्येकी एका गेटची किंमत २७०० रुपये असून, एकूण १७ गेटची किंमत ४५९०० रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केला, .अशा फ़िर्यादीवरुन मानोरा पोलिसांनी अज्ञात चोरटयांवर कलम ३७९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास बिट जमादार पांडुरंग बेंद्रे करित आहेत.