रिसोड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 03:50 PM2018-09-17T15:50:31+5:302018-09-17T15:50:40+5:30
रिसोड : येथील तालुका दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मागील बाजूची खिडकी तोडून चार हजार रुपये किंमतीचा मोटारपंप अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १७ सप्टेंबरला सकाळी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : येथील तालुका दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मागील बाजूची खिडकी तोडून चार हजार रुपये किंमतीचा मोटारपंप अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १७ सप्टेंबरला सकाळी उघडकीस आली.
रिसोड शहराच्या मध्यवर्ती भागात तालुका दुय्यम निबंधक कार्यालय आहे. १६ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्याने या कार्यालयाच्या मागील बाजूस असलेली खिडकी तोडून कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयात असलेला चार हजार रुपये किंमतीचा मोटारपंप लंपास केला. याप्रकरणी रिसोड पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. पोलीस पथकाने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा करण्यात आला असून, अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कार्यालयातील इतर कागदपत्रे, प्रस्ताव सुरक्षीत असल्याचे सांगण्यात येत आहे. चोरट्याने चोरी नेमक्या कोणत्या उद्देशाने केली, या दृष्टिकोनातून तपास सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल खुळे करीत आहेत.