रिसोड शहरात एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 04:20 PM2020-08-02T16:20:19+5:302020-08-02T16:20:38+5:30
चोरट्यांनी जवळपास अडीच लाखांचा ऐवज लंपास केला असून, याप्रकरणी रिसोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड: एकिकडे कोरोनामुळे शहरवासियांमध्ये धास्ती असताना, १ आॅगस्टच्या रात्रीदरम्यान शहरात एक दुकान व दोन घरात चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. चोरट्यांनी जवळपास अडीच लाखांचा ऐवज लंपास केला असून, याप्रकरणी रिसोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
शहरातील भाजीमंडी समोरील एका कॉम्प्लेक्समधील शिवशंकर कायंदे यांच्या वैष्णवी इलेक्ट्रॉनिक्सचे दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. १२ एलईडी, मिक्सर व इतर सामान्य मिळून तब्बल दोन लाखाचा ऐवज लंपास केला. दुसº्या घटनेत शहरातील प्रतिबंधित क्षेत्र पठानपुरा येथे दोन ठिकाणी घरफोडी झाली. शेख जमिर शेख लुकमान हे हाथगाड्यावर रेडिमेड कापड व्यापार करीत असून ते पठाणपुºयात भाड्याने राहतात. १ आॅगस्ट रात्री ९ वाजतादरम्यान ते आपल्या नातेवाइकांकडे जेवायला गेले असता रात्री १०.३० वाजता परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे निदर्शनात आले. खिडकी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत पेटितील रोख ३१ हजार ४०० रुपये लंपास केले. तिसºया घटनेत पठानपुरा येथील क्वारंटीन असलेल्या एका व्यक्तीच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाट तोडून त्यातील २० हजार नगदी लंपास केले. या तिन्ही घटनेत चोरट्यांनी २ लाख ५१ हजार ४०० रुपयाचा ऐवज लंपास केला.