...तर जिल्ह्यातील ६०० गावांत सुरू होणार शाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:26 AM2021-06-27T04:26:30+5:302021-06-27T04:26:30+5:30

मागील काही महिन्यांपासून जी गावे कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावांतील इयत्ता दहावी, बारावीचे ...

... then schools will be started in 600 villages of the district! | ...तर जिल्ह्यातील ६०० गावांत सुरू होणार शाळा !

...तर जिल्ह्यातील ६०० गावांत सुरू होणार शाळा !

Next

मागील काही महिन्यांपासून जी गावे कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावांतील इयत्ता दहावी, बारावीचे वर्ग सुरू करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पहावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील ६३२ गावे २५ जूनपर्यंतच्या अहवालानुसार कोरोनामुक्त असून, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार यातील जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यात ही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करत गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावांतील शाळा सुरू करण्याबाबत पडताळणी होेऊ शकते; परंतु राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार जिल्ह्यातही सोमवारपासून नव्याने निर्बंध लागणार असून, यात शैक्षणिक संस्थाही बंद ठेवण्यात येणार आहेत.

बॉक्स:

१) जिल्ह्यातील एकूण गावे -७८९

२) सध्या कोरोनामुक्त असलेली गावे ६३२

तालुकानिहाय कोरोनामुक्त गावे.

१) वाशिम -१०३

२) कारंजा -१५७

३) मंगरुळपीर -९७

४) रिसोड - ६२

५) मालेगाव -८५

६) मानोरा -१२८

---------------

बॉक्स:

जिल्ह्यातील एकूण शाळा -१३७९

१) जि. प. शाळा ७७३

२) अनुदानित शाळा १८४

३) विनाअनुदानित शाळा ४२२

---------------

बॉक्स : कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

१) पाचवी -२१०५२

२) सहावी -२११३६

३) सातवी -२१४३६

४) आठवी -२१५००

--------------------

कोट : मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार कोरोनामुक्त असलेल्या गावांत पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत सोमवारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या बैठकीत विचारविनिमय होणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १२ जुलैपर्यंत शैक्षणिक संस्था बंदच ठेवाव्या लागणार आहेत.

-गजाननराव डाबेराव,

प्र. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जि.प. वाशिम

---------

Web Title: ... then schools will be started in 600 villages of the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.