पीक नुकसानाच्या सर्वेक्षणाचे स्पष्ट निर्देशच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 01:56 PM2020-01-04T13:56:21+5:302020-01-04T13:56:27+5:30

प्रशासन पीकनुकसानाची पाहणी करीत असले तरी, या प्रक्रियेनंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मंजूर होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

There are no clear instructions for a crop loss survey! | पीक नुकसानाच्या सर्वेक्षणाचे स्पष्ट निर्देशच नाहीत!

पीक नुकसानाच्या सर्वेक्षणाचे स्पष्ट निर्देशच नाहीत!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यातील काही भागात गत दोन दिवसात अवकाळी पाऊस व गारपिटीने खरिपातील तूर पिकासह रब्ब्बी हंगामातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला असला तरी, शासनाकडून अद्याप या नुकसानाचे सर्व्हेक्षण करण्याचे निर्देशच आले नाहीत. आता प्रशासन पीकनुकसानाची पाहणी करीत असले तरी, या प्रक्रियेनंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मंजूर होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
गेल्या दोन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे खरीप हंगामाती तूर, रब्बी हंगामातील गहू, हरभºयासह भाजीपाला आणि फळवर्गीय पिकांचे नुकसान झाले. आता या नुकसानाची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाकडून प्रशासनाला स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाहीत. यंदा सातत्याने विविध नैसर्गिक आपत्तीचे संकट शेतकºयांवर ओढवत आहे. आॅक्टोबर, नोव्हेंबरमधील अवकाळी पाऊस, त्यापूर्वी पावसाचा खंड आदिंमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला. यात आॅक्टोबर,नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाच्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यामुळे प्रशासनाने लगबगीने पंचनामे केले आणि शेतकºयांना आर्थिक मदतही वितरीत करण्यात आली. तथापि, गत दोन दिवसांतील अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाही शासनाकडून या संदर्भात स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले आहेत.

नैसर्गिक आपत्तीमधील पीक नुकसानाच्या पाहणीसंदर्भात १४ प्रकारच्या आपत्तींसाठी पीक नुकसानाची पाहणी करण्याचे शासनाचे स्थायी निर्देश आहेत. त्यात अतिवृष्टी आणि गारपिटीचा समावेश असून, त्यामुळे शासनाच्या स्वतंत्र निर्देशाची गरज नाही. वाशिम जिल्ह्यात या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणीही करण्यात येत आहे. या पाहणीनंतर शेतकºयांना मदत देण्यासाठी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे मागणीही करण्यात येणार असून, शेतकºयांना शासन निर्णयानुसार मदतही मिळणार आहे.
-शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: There are no clear instructions for a crop loss survey!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.