ज्येष्ठांना कोरोना लस देण्यासंबंधी कुठलेच निर्देश नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:55 AM2021-02-27T04:55:50+5:302021-02-27T04:55:50+5:30
कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सरकारी व खासगी क्षेत्रातील आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस (कोविशिल्ड) देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात ...
कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सरकारी व खासगी क्षेत्रातील आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस (कोविशिल्ड) देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात पोलीस, महसूल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (शहरी व ग्रामीण) अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले; तर मार्च महिन्यापासून ५० वर्षांवरील ज्येष्ठ व अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रत्यक्षात मात्र यासंबंधीचे कुठलेही अधिकृत आदेश अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे १ मार्चपासून लसीकरण प्रक्रियेस सुरुवात होणार नसल्याचे दिसून येत आहे.
..............
कोट :
ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याबाबत शासनाकडून कुठलेही अधिकृत आदेश प्राप्त झालेले नाहीत. आरोग्य विभागाकडे सध्या ११ हजार ६०० डोस उपलब्ध असून आदेश प्राप्त झाल्यानंतर नियोजन करून लसीकरण प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
- डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम