७० पोलिस कर्मचाऱ्यांसाठी फक्त चार निवासस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 02:12 PM2018-12-26T14:12:20+5:302018-12-26T14:12:43+5:30

वाशिम : सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रिदवाक्य उराशी बाळगुन कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाºयांना साधी राहण्याची सुविधा मानोरा पोलिस स्टेशनला नाही

There are only four residences for 70 police personnel | ७० पोलिस कर्मचाऱ्यांसाठी फक्त चार निवासस्थान

७० पोलिस कर्मचाऱ्यांसाठी फक्त चार निवासस्थान

googlenewsNext


मानोरापोलिस स्टेशन : निवासाचा प्रश्न ऐरणीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रिदवाक्य उराशी बाळगुन कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाºयांना साधी राहण्याची सुविधा मानोरा पोलिस स्टेशनला नाही . एकूण ७० पोलिस कर्मचाºयांसाठी फक्त चारच अन तेही मोडकळीस आलेले निवासस्थान असल्यामुळे पोलिसाना अनेक समस्याचा सामना करावा लागत आहे. 
२४ तास जनसेवेचा वसा घेतलेला पोलिसांना नेहमीच तत्पर रहावे लागते, त्यासाठी  मुक्कामी असणे गरजेचे आहे.  मानोरा पोलिस स्टशनच्या आवारात एकूण सहा निवासस्थान आहे.  त्यात दोन निवासस्थान धोकादायकस्थितीत आहे.  केवळ चारच निवासात पोलिसाना रहावे लागते.  पोलिसाची वसाहत व्हावी यासाठी अद्याप पावतो निर्णय झालेला नाही. पोलिसांना निवासा नसल्यामुळे अनेक समस्याला समोर जावे लागते. ६७ पोलिस कर्मचारी तीन अधिकारी यांना निवासस्थानाअभावी शहरात कुठलीच सुविधा नसलेल्या ठिकाणी रहावे लागत आहे. या व्यतिरिक्त पाण्याची सुविधा निवासस्थानात नाही . पोलिस स्टेशनच्या आवारात असलेला बोअरवेलला घाण पाणी येत असल्याने त्याचा परिणाम पोलिसाच्या आरोग्यावर होत आहे.  परंतु याकडे कुणाचे लक्ष दिसून येत नाही. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी याकडे लक्ष देवून हा प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा पोलीस कर्मचाºयांतून व्यक्त केली जात आहे.

Web Title: There are only four residences for 70 police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.