कोरोनाची नाही उरली भिती, मोफत बुस्टरलाही मिळेना गती; जिल्ह्यातील ४.९३ लाख लाभार्थी वंचितच

By दादाराव गायकवाड | Published: September 24, 2022 06:11 PM2022-09-24T18:11:05+5:302022-09-24T18:11:43+5:30

केंद्र शासनाने १५ जुलैपासून ७५ दिवस १८ वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस मोफत देण्याची घोषणा केली होती. वाशिम जिल्ह्यात शासनाच्या घोषणेनुसार १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत बुस्टर देण्यास सुरूवात झाली.

There is no fear of Corona, even free boosters are not getting speed; 4.93 lakh beneficiaries of the district are deprived | कोरोनाची नाही उरली भिती, मोफत बुस्टरलाही मिळेना गती; जिल्ह्यातील ४.९३ लाख लाभार्थी वंचितच

कोरोनाची नाही उरली भिती, मोफत बुस्टरलाही मिळेना गती; जिल्ह्यातील ४.९३ लाख लाभार्थी वंचितच

Next

वाशिम - केंद्र शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत बुस्टर डोस देण्याची योजना सुरू केली; परंतु कोरोनाची भीती आलता लोकांत नसल्याने दोन महिने उलटत आले तरी जिल्ह्यात या डोससाठी पात्र असलेल्या ५ लाख ७४ हजार ३७४ नागरिकांपैकी केवळ ८० हजार ७१३ लोकांनी बुस्टर डोसचा लाभ घेतला आहे. मोफत बुस्टरची मुदत ५ दिवसांत संपणार असतानाही जिल्ह्यातील ४ लाख ९३ हजार ६८१ पात्र नागरिक या डोसपासून वंचितच आहेत. 

केंद्र शासनाने १५ जुलैपासून ७५ दिवस १८ वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस मोफत देण्याची घोषणा केली होती. वाशिम जिल्ह्यात शासनाच्या घोषणेनुसार १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत बुस्टर देण्यास सुरूवात झाली. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले ५ लाख ७४ हजार ३७४ नागरिक मोफत बुस्टरसाठी पात्र आहेत. तथापि, गत ७० दिवसांत जिल्ह्यातील केवळ ८० हजार ७१३ लोकांनी बुस्टर डोसचा लाभ घेतला आहे. अद्यापही ४ लाख ९३ हजार ६८१ पात्र नागरिक या डोसपासून वंचितच आहेत. आता मोफत बुस्टरची मुदत ५ दिवसांत अर्थात ३० सप्टेंबरला संपणार आहे. त्यामुळे या पाच दिवसांत अधिकाधिक लोकांनी मोफत बुस्टर डाेस घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

१८ वर्षावरील लसीकरणाची स्थिती
एकूण लाभार्थी - ९,८२,२४८
पहिला डाेस - ८,१६,८८०
दुसरा डोस - ६,७१,१५७
बुस्टर डोससाठी पात्र - ५,७४,३९४
बुस्टर डोस - ८०,७१३
 

Web Title: There is no fear of Corona, even free boosters are not getting speed; 4.93 lakh beneficiaries of the district are deprived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.